Temperature in Maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

आजपासून वाढणार महाराष्ट्राचे तापमान, जाणून घ्या हवामानाचा मूड कधी बदलणार

नागपूर आणि नाशिकमध्ये आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात आज शुक्रवारी मुंबई आणि पुण्यासह अनेक प्रमुख ठिकाणी आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून हवामान कोरडं राहण्याची शक्यता बवामान वेधशाळेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊ शकते आणि उष्णतेचा प्रभावही वाढू शकतो. मात्र, नागपूर आणि नाशिकमध्ये आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. (Temperature in Maharashtra)

त्याचवेळी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) विदर्भात 13 ते 15 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. यानंतर, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे, हवामानाचा मूड बदलणार असून ढगाळ वातावरणासह पावसाचीही शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील उष्णतेचे प्रमाण कमी होईल असा अंदाज आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये समाधानकारक ते मध्यम श्रेणीत नोंदवला जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.

मुंबई

शुक्रवारी मुंबईत कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 108 वर नोंदवला गेला.

पुणे

पुण्यात कमाल तापमान 36 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दिवसा हवामान स्वच्छ राहील. दुपारनंतर आकाशात हलके ढग दिसतील. त्यामुळे पावसाचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

नागपूर

विदर्भातील नागपुर जिल्ह्यात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशतः ढगाळ राहू शकते. त्याच वेळी नागपूरकरांना उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

नाशिक

नाशिकमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी हवामान निरभ्र असेल, मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद

औरंगाबादमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT