Periods Superstition Dainik Gomantak
महाराष्ट्र

मासिक पाळीदरम्यान आदिवासी विद्यार्थीनीशी भेदभाव: वृक्षारोपण करण्यापासून रोखलं

मुलींच्या शाळेच्या दिवसात मासिक पाळी येणे हे खुप कॉमन झाले असताना एक धक्कादायक बाब महाराष्ट्रातील एका आश्रमशाळेतून समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

मासिक पाळी हि एक शरिरात घडणारी नैसर्गिक process आहे. एका नव्या जिवाला जन्माला घालण्याची क्षमता फक्त महिलांमध्ये आहे. आणि त्याचे मुख्य कारण मासिक पाळी आहे. शरीरामधील होणारे बदल हे निसर्गाची किमया आहे. ठराविक वयानंतर मुलींना मासिक पाळी सुरू होते. मुलींच्या शाळेच्या दिवसात मासिक पाळी येणे हे खुप कॉमन झाले असताना एक धक्कादायक बाब महाराष्ट्रातील एका आश्रमशाळेतून समोर आली आहे. (Periods Superstition)

मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना कुटूंबात शुद्र वागणूक दिली जाते हे आपण एकले असेल किंवा बघितलंही असेल. पण शाळेत जेव्हा शिक्षकच मुलिंना मासिकपाळी दरम्यान दुय्यम वागणूक देत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कोणत्याही वस्तू ला स्पर्श करु न देणे, काही धार्मिक विधीं मध्ये जाण्याची बंधने घालणे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊ न देणे असे विविध प्रकार आपण बघत असतो. मासिक पाळी विषयी पिढ्यान पिढ्या खुप काही अंधश्रद्धा चालत आलेल्या आहेत आज आज तर एका शिक्षकाने एका विद्यार्थीनीला मासिक पाळी आल्याने वृक्षारोपन करण्यास नकार दिला.

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना घडल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मासिक पाळी आली म्हणून एका महाविद्यालयीन तरुणीला वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याचा प्रकार आश्रमशाळेत घडला.मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरच्या देवगाव आदिवासी आश्रमशाळेत हा लाजिरवाणा प्रकार घडला आहे.

मासिक पाळी आलेल्या मुलीने झाड लावले तर ते झाड मोठं होत नाही किंवा जळून जात असा अजब गजबत तर्क शिक्षकांनी लावला. याप्रकरणी विद्यार्थीनीने आदिवासी विकास विभागाकडे तक्रार देखील केली. हा संपूर्ण प्रकार समोर येताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, एका आठवड्यापुर्वी त्र्यंबकेश्वरच्या येथील देवगावच्या आदिवासी आश्रमशाळेत वृक्षारोपण सुरू होतं. यावेळी 10 मुलींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार होतं. तेव्हा शिक्षकांनी वृक्षारोपन करणाऱ्या 10 पैकी मासिक पाळी असलेल्या विद्यार्थिनीला सगळ्यांसमोर बाहेर काढलं.

विद्यार्थीनीने व्यक्त केल्या भावना

'दोन ते तीन आठवड्यांपूर्वी आमच्या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता. तेव्हा आम्ही सर्व मुली झाडे लावण्यासाठी मैदानावर जमलो. तेव्हा आमचे सर बोलले मागच्या वर्षी आम्ही जे झाडं लावले ते जगले नाही, त्याचं कारण असं की मुलींनी मासिक पाळी आल्यावर ते वृक्षारोपन केले होते त्यामुळे ती झाडे जगली नाहीत. इतकंच नाही तर 'शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की, ज्या मुलीला मासिक पाळी आली आहे त्यांनी आता या पुढे झाडे लावायची नाही, त्यांनी लावलेली झाडे लवकर मरतात. याशिवाय मासिक पाळी आलेल्या मुलींनी नव्याने लावलेल्या झाडांकडे सुद्धा यायचं नाही', असं शिक्षकांनी आम्हाला म्हटलं असल्याचा आरोप विद्यार्थीनीने केला आहे.

शिक्षकांच्या वागणूकीचं विद्यार्थीनींना आश्चर्य

तुम्ही जास्त शहाण्या झाल्या आहेत का? तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या कोण'? अशी दमदाटी सुद्धा शिक्षकांनी पीडित मुलींना केली असल्याचा आरोप विद्यार्थीनीने केला आहे.

दरम्यान, एकीकडे देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान झाल्या. तर दुसरीकडे आदिवासी मुलींनाच अशी वागणूक मिळत असल्याने खरचं आपल्या देशात महिलांना मानसन्मान दिला जातो का? किंवा मासिक पाळीविषयी जनजागृती करणारे शिक्षकच मुलिंना दिय्यम वागणूक देत आहेत का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित झाले आहेत. आता या आश्रमशाळेवर प्रशासन काय कारवाई करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

Goa Politics: गोवा काँग्रेसची राहुल गांधी, खर्गेंसोबत मीटिंग! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा

Goa News: सरकारी, सार्वजनिक भूखंडांवर राहणार आता कडक नजर! तालुकानिहाय पथके स्थापन; सुट्ट्यांच्या दिवशीही कडक देखरेख

Goa Theft: गोव्यात चोरट्यांचा धुमाकूळ! म्हापसा, पर्वरी, थिवी, कोलवाळ परिसरात 7 घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास

Goa Accident Death: अंजुणे धरणाजवळ भीषण अपघात! युवतीचा मृत्यू, 5 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT