Suspicious object found at Pune railway station  Dainik Gomantak
महाराष्ट्र

पुणे रेल्वे स्थानकात सापडलेली संशयास्पद वस्तू स्फोटक नाही; पोलिसांची माहिती

स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामा करण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

पुणे रेल्वे स्थानकात आज संशयास्पद वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली. या घटणेमुळे प्रवाशांमद्धे भीतीचे वातावरण पसरले आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामा करण्यात आला आहे. तसेच रेल्वे वाहतूक देखील थांबवण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे. (Suspicious object found at Pune railway station not gelatin sticks says police)

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. “साडेदहा वाजता स्थानकावर संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती मिळाली. ही वस्तु जिलेटिन नाही अशी प्राथमिक माहिती आहे. पण तपासणी सुरु आहे. सध्या जास्त काही सांगू शकत नाही. लोकांनी घाबरण्याचं कारण नाही,” असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

पुणे रेल्वे स्थानकावर संशयास्पद वस्तु सापडल्याची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश नाही.
स्टेशन मास्तर, रेल्वेचे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांची पुणे रेल्वे स्थानकामधील कार्यालयामध्ये बैठक सुरु असल्याचीही माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT