Rupali chakankar Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी

''पुढील 24 तासात जीवे मारू असा अज्ञाताने इशारा दिलाय''

दैनिक गोमन्तक

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चाकणकर यांनी गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणून पक्षाची ध्येयधोरणे यांना सक्रियरित्या अवलंबत विरोधी पक्षांना चांगलाच घाम फोडला आहे. चाकणकर यांची आंदोलनाची पद्धत, विरोधी पक्षांला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता आहे. त्यामूळे त्यांनी कमी कालावधीत आपलं वेगळेपण राजकारणाच्या पटलावर चांगलंच उमटवले आहे. सध्या त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून आपली जबाबदारी (State Women's Commission chairperson Rupali Chakankar receives death threats )

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत अद्याप कोणती ही अधिकची माहिती मिळाली नसली तरी. फोन करणारे कोण यावरुन तर्क - वितर्क लावले जात आहेत. अज्ञाताने राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑफीसला फोन करुन रूपाली चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारू असा इशारा दिलाय. धमकीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र मागील काही दिवसांत तिसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे.

अवघ्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळतं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT