Transport Minister Anil Parab Dainik Gomantak
महाराष्ट्र

'एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर': मंत्री अनिल परब

मेस्मा कायदा कामगारांना लागू शकतो.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सुरु असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे अंदोलन अजूनही थांबलेले नाही. ठाकरे सरकारने (Thackeray government) काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. यातच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंबंधी माध्यमाशी संवाद साधला.

परब यांनी यावेळी म्हटले, ''कामावर परतणाऱ्या कामगारांना धमकावण्याचे काही एक काम नाही. एसटी संपाच्या नावावर काही राजकीय व्यक्ती आणि पक्ष त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर मेस्मा कायदा कामगारांना लागू शकतो. एसटी अत्यावश्यक सेवेत येते. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. तसचे एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा बेकायदेशीर आहे.''

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपावरुन पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर कामगारांच्या पगारवाढीवरुन मागील काही दिवसांपासून पसरत असलेल्या अफवांवरही भाष्य केले. यावेळी परब म्हणाले, “ काही राजकीय विरोधक कामगारांची पगारवाढ ही फसवी असल्याचे सांगत सरकार लवकरच ही पगारवाढ मागे घेणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. मात्र मी हे आता स्पष्ट करतो की, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे ही पगारवाढ मागे घेण्याचा कोणताच प्रश्न येत नाही.”

दरम्यान, मंत्री परब म्हणाले, एसटी महामंडळाच्या विलिनीकरणावर उच्च न्यायालयाने मागील काही दिवसांपूर्वी नेमलेल्या समितीच्या माध्यमातून निर्णय होईल असं सांगितलं होतं. तोपर्यंत ठाकरे सरकारने एसटी कामगारांबाबत सहानभुतीपूर्वक धोरण घेऊन चांगली पगारवाढ दिली आहे. मात्र दुसरीकडे ही पगारवाढ फसवी असून सरकार लवकरच मागे घेणार असल्याचे राज्यातील विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. यावेळी मी स्पष्ट करतो की, सरकारने पगारवाढीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ही कामगारांना दिलेली पगारवाढी मागे घेण्याचा प्रश्नच उरत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT