Mumbai-Goa Highway Parshuram Ghat Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: लवकरच तोडगा! मुंबई-गोवा महामर्गावरील परशुराम घाटातील मातीचं सर्वेक्षण सुरु

Mumbai-Goa Highway Parshuram Ghat: मुंबई-गोवा महामर्गावर रत्नागिरी चिपळूण दरम्यान परशुराम घाट लागतो. हा या मार्गावरील सर्वात महत्वाचा टप्पा आहे.

Manish Jadhav

Mumbai-Goa Highway Parshuram Ghat: मुंबई-गोवा महामर्गावर रत्नागिरी चिपळूण दरम्यान परशुराम घाट लागतो. हा या मार्गावरील सर्वात महत्वाचा टप्पा आहे. मात्र आता, हाच घाट मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी धोकादायक ठरत आहे. परशुराम घाटात सातत्याने संरक्षण भिंत कोसळण्याच्या घटना घडतायेत. यामुळेच आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी परशुराम घाटातील मातीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

माती सर्वेक्षण

दरम्यान, परशुराम घाटातील मातीचे सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरु झालीये. पावसाळ्यात संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना या घाटात वारंवार घडतात. त्यामुळेच आता हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता यांच्यासह प्रमुख अधिकारी परशुराम घाटात माती परिक्षणासाठी पोहोचले आहेत. माती परिक्षणानंतर घाटातील संरक्षक भिंत उभारण्याची डिझाईन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

12 वर्षांपासून महामार्गाचं काम रखडलयं

गेल्या 12 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) काम कधी पूर्ण होणार हा प्रश्नच आहे. कित्येक सरकारे आली आणि गेली मात्र या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात कोणीच रस घेतला नाही. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत महामार्गाचे काम करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र कामाचा वेग पाहता अजून काही वर्षे लागू शकतात असचं म्हणता येईल. नागोठणे, कोलाड, पुई, माणगाव, लोणेरे आणि टेमपाले इथल्या प्रमुख पुलांची कामं रखडलेली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT