Sindhutai Sapkal

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं आज पुण्यामध्ये निधन झालं.

दैनिक गोमन्तक

भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. सिंधुताईचे रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील गॅलेक्झी रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाले. महिनाभरापूर्वीचं सिंधुताईंवर हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने सिंधुताईंचे निधन झाले.

दरम्यान, सिंधुताईंनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत राज्यातील तसेच देशातील हजारों अनाथ मुलांचा संभाळ केला. विशेष म्हणजे त्यांना 2012 डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता. तर 2021मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या 75 वर्षांच्या होत्या.

शिवाय, सिंधुताई मुळच्याच तल्लक बुध्दिमान होत्या. त्यांना चौथीपर्यंतच शिकता आलं. वयाच्या नवव्या वर्षी त्या विवाहबंधनात अडकल्या. त्यांच्या आयुष्यातील संर्घषमय परिस्थितीमुळे त्यांना समाजसेवेकडे वळवलं. त्यांनी अनाथ मुलांचा संभांळ करण्यासाठी ममता बाल सदन नावाची संस्थेची स्थापना केली होती. सिंधुताई आपल्या मुलीला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून पुढील शिक्षणासाठी सेवासदनमध्ये दाखल केले होते. आणि त्या राज्यातील इतर अनाथ मुलांसाठी आधार म्हणून पुढे आल्या. त्यांनी या अनाथ मुलांसाठी शिक्षणाची सोय केली. त्याचबरोबर या मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन करत असत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT