Sindhudurg Bus Cancelled Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg Bus Cancelled: गणपतीच्या खरेदीला जायचंय पण बसच नाही! सिंधुदुर्गात एसटीच्या 230 फेऱ्या रद्द, मुंबई-ठाण्याला पाठवल्या बस

230 ST Bus Services Cancelled in Sindhudurg: कोकणात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून गावाकडे जाण्या-येण्यासाठी लोकांची ये-जा वाढली आहे.

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग : कोकणात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून गावाकडे जाण्या-येण्यासाठी लोकांची ये-जा वाढली आहे. अशा वेळी अचानक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल २३० एसटी बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरी भागातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या भागाकडे जास्तीत जास्त बसेस वळवल्या गेल्या आहेत.

मात्र, याचा फटका थेट स्थानिक कोकणवासियांना बसला असून, त्यांचे दैनंदिन प्रवासाचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शालेय विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे कर्मचारी तसेच बाजारपेठेत जाणारे नागरिक हे अचानक बसफेऱ्या रद्द झाल्यामुळे अडचणीत सापडले आहेत.

सिंधुदुर्गातील मालवण, कणकवली, सावंतवाडी, देवगड आणि वैभववाडी या प्रमुख आगारांमधून नियमित धावणाऱ्या बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे सकाळपासून बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी प्रवाशांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागली. काही ठिकाणी प्रवासी नाराजी व्यक्त करताना दिसले.

दरम्यान, एसटी प्रशासनाने गणेशोत्सव काळात मुंबई-कोकण प्रवासासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले आहे. मात्र त्यासाठी स्थानिक प्रवाशांच्या दैनंदिन फेऱ्यांचा बळी दिला गेल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. "गावोगावी सणासुदीची खरेदी करायला जायचे, पण बस नाही; मग काय करायचे?" अशा प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: ''तपासात कोणत्याही राजकारण्याचे नाव नाही'', रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा!

Borim Bridge Issue: बोरी पुलाचा खोळंबा! वाहतुकीसाठी खुला न झाल्याने गोंधळ

Renuka Devi History: यल्लम्मादेवी! नरसंहारातील पीडित समुदायांची तारणहार

Viral Video: "तू इथे आलास तर तुझं मुंडकं कापेन!"; विनातिकीट प्रवास करणाऱ्या शिक्षिकेचा टीटीईला धमकी देणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल

Rama Kankonkar: 'रामाच्या 'बोलवत्या धन्या'ला शोधा', खासदार तानावडेंचा रोखठोक पवित्रा; म्हणतायत, "हे आरोप निराधार"

SCROLL FOR NEXT