Floods Updates Dainik Gomantak
महाराष्ट्र

Floods Updates : आम्ही काय खायचं म्हणत, अनेकांना अश्रू अनावर

काल पासून सुरू असलेल्या पावसामुळे गोव्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावांना पुराचा फटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

सिंधुदुर्ग : काल पासून सुरू असलेल्या पावसामुळे गोव्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावांना पुराचा फटका बसला आहे. बांदा जवळील विलवडे मळावाडी घरा घरात पाणी घुसल्याने धान्य पुराच्या पाण्यात वाहून गेले, आम्ही खायचं काय ? असे म्हणत आपले दुःख व्यक्त करताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले आहेत.

तेरेखोल नदीच्या पात्राजवळ असलेल्या बांदा शहरासह, शेर्ले, इन्सुली येथील अनेक घरात पाणी शिरले. बांदा बाजारपेठेतील शेकडो दुकाने पुराच्या पाण्याने व्यापून गेली. दुकानदारांना पुराचे वाढते पाण्याचा धोका लक्षात घेता आपले समान सुस्थितीत हलवावे लागले. शेकडो लोकांना कालची रात्र जीव मुठीत धरून काढावी लागली. आपत्कालीन यंत्रणेला माहिती देण्यात आली मात्र, मदतीसाठी कुठलीही यंत्रणा दाखल न झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान आंबोली परिसरामध्ये गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दोन वाजता घाटामध्ये दरड कोसळली. आणि आज सकाळी पूर्वेचा वस या ठिकाणी दरडीचा काही भाग रस्त्यावर आला आहे. त्यामुळे तब्बल दहा तासाहून अधिक वेळ घाट रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

VIDEO: कदंब कर्मचाऱ्यांवर कोयता घेऊन धावला; हल्ल्याच्या प्रयत्नानंतर रिवे मार्गावरील बससेवा दोन दिवसांपासून बंद

SCROLL FOR NEXT