Crime Scene Dainik Gomantak
महाराष्ट्र

धक्कादायक ! आईचे प्रेमसंबंध उघड करणाऱ्या आठ वर्षीय मुलाची हत्या

या प्रकरणात 21 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याने त्याच्या प्रयेसीच्या मुलाची हत्या केली.

दैनिक गोमन्तक

आईच्या प्रेमसंबंधाची (love affair) बातमी वडिलांना दिली म्हणून एका निरागस आठ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात 21 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याने त्याच्या प्रयेसीच्या मुलाची हत्या केली. भिवंडीमधील (Bhiwandi) या कुटुंबाच्या घरी आचारी म्हणून नोकरी करत होता. आचाऱ्याबरोबर असलेल्या पत्नीच्या प्रेमसंबंधबद्दल समजल्यानंतर पतीने आरोपी असणाऱ्या जितेंद्रला नोकरीवरुन काढून टाकले होते. घरातून मुलगा गुरुवारपासून बेपत्ता होता. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये अपहरण झाल्याची तक्रार नोदंवण्यात आली. मात्र दुर्देवाने मुलाचे कुटुंब ज्या इमारतीमध्ये राहत होते, त्याच इमारतीमधील एका बंद प्लॅटमध्ये शुक्रवारी सकाळी मृतदेह सापडला.

या कुटुबांच्या घरी जितेंद्र नोकरी करत होता आणि अलीकडेच त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जितेंद्रला पोलिसांनी अटक केल्यानंतर कसून चौकशी केली. त्यामध्ये त्याने मुलाने आपले प्रेमसंबंध उघड केले म्हणून रागामधून मुलाची हत्या केली असल्याची कबुली दिली, अशी माहिती प्रदिप गुप्ता यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT