Shiv Sena will support NDA candidate Draupadi Murmu Dainik Gomantak
महाराष्ट्र

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय, NDAच्या उमेदवाराला पाठिंबा

मागील राजकीय उलथापालथीमुळे भाजप आणि शिवसेनेतील मतभेद वाढले असताना सेनेने मोठा निर्णय घेतला आहे

दैनिक गोमन्तक

Presidential Election: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून लवकरच जाहीर होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील बिघडलेल्या संबंधानंतर हा निर्णय जनतेसाठी धक्कादायक आहे. मागील राजकीय उलथापालथीमुळे भाजप आणि शिवसेनेतील मतभेद वाढले आहे. (Shiv Sena will support NDA candidate Draupadi Murmu)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याचा उद्धव यांचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का मानला जात आहे. विरोधकांनी माजी आयएएस अधिकारी आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी, शिवसेनेच्या काही खासदारांनी असेही म्हटले होते की पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा.

गेल्या आठवड्यात पक्षाचे खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांनी ठाकरे यांना पत्र लिहून मुर्मूला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने यापूर्वी काँग्रेस नेत्या प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.

दुसरीकडे, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात एनडीएने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ शिंदे गटातील दीपक केसरकर दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT