Sharad Pawar's visit to CM Dainik Gomantak
महाराष्ट्र

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ,भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

ही भेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर होत असून या बैठकीला राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) हे सुद्धा उपस्थित आहेत.

दैनिक गोमन्तक

मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात भेटी गाठींच सत्र सुरु आहे. कालच संजय राऊत(Sanjay Raut ) यांनी ३ दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांदा भेटले त्यानंतर लगेच संजय राऊत यांनी राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. आणि आजही राज्याचा राजकारणात एक मोठी घडामोड होताना दिसत आहे.कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी (CM Uddhav Thackeray) त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा होत आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे .

ही भेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर होत असून या बैठकीला राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) हे सुद्धा उपस्थित आहेत. आजच दुपारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते.ही बैठक संपताच शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत त्यामुळे नेमकं या भेटीमागे काय दडलं आहे याचा अंदाज लावणे थोडास अवघड आहे.

येत्या जुलै महिन्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरणार असल्याचं लक्षात घेता राजकीय स्ट्रॅटेजी करण्यासाठी काय पावलं उचलावी यावर या बैठकीत चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे मात्र याबात अजूनही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

आज सकाळीच सामाजिक नेत्या मेधा पाटकर, आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शरद पवारांची भेट घेऊन केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आपली भूमिका मांडली होती आणि याच बैठकीत मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाहीत अस गाऱ्हाण या नेत्यांनी शरद परर यांचासोमर मांडलं होत या भेटीत हाही मुद्दा उपस्थित होईल अशी चर्चा आहे.

त्याबरोबरच सध्या राज्यातील नेत्यांवर जो ईडीचा ससेमेरा लागला हे त्यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्टवादीचे अनिल देशमुख यांच्यावर सध्या ईडीची कारवाई सुरु आहे तसेच शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनाही काहीदिवसांपूर्वी ईडीने समन्स बजावला होता त्यावरही या दोन नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊ शकते अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

दरम्यान आज दुपारीच शवसेना नेते संजय राऊत यांनी," महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाही. सर्वकाही व्यवस्थित आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. पण केव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. तीन वेगवेगळे पक्ष असल्यामुळे थोडे फार मतभेद होतीलच. पण, आमच्यात कोणतीही नाराजी नाही. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात. पण नाराज कुणीच नाही."असे विधान केले होते या भेटीनंतर त्यांच्या या विधानाबद्दल हे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहन महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

SCROLL FOR NEXT