Sharad Pawar
Sharad Pawar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

"ED ने मला नोटीस पाठवली आणि महाराष्ट्राने त्यांना येडी ठरवलं"

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या निकटवर्तीयांवर काल आयकर विभागाने छापे टाकले होते. तसेच अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात होते. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सोलापूरमध्ये बोलत होते. अजित पवारांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांची चिंता त्यांना वाटत नाही, असा टोला पवारांनी लगावला. यावर कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना प्रतिसाद दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले, आज बऱ्याच दिवसानंतर सोलापूरला आलोय. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमचे धावपळ सुरू होती. तसेच सोलापूर जिल्हा हा एकेकाळचा औद्योगिक जिल्हा होता.

अनेक लोक आमचा पक्ष सोडून गेले आहेत. तरुण कार्यकर्त्यामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. आता आम्ही पाळपुट्याच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याची सुरुवात सोलापुरातून केली आहे.

यावेळी एक चर्चा होती की भाजपा (BJP) सर्वत्र येणार परंतु आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अजित पवारांच्या नेतृत्वात सरकार आले आहे. आपला देश ब्रिटिशांच्या सम्राज्यात होता. यात सोलापूर हे हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. जवाहरलाला नेहरून्नी या देशात पायाभूत सुविधा कशा देता येतील यासाठी प्रयत्न केले होते.

आज केंद्र सरकार हे रेल्वे लाईन (Railway) तसेच इतर गोष्टी चे खासगीकरण करत आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल चे भाव दिवसेंदिवस भाव वाढ होत आहेत. केंद्र सरकाराची नीती ही महागाईला निमंत्रण देणारी आहे. देशातील शांततेच्या मार्गाने अवलोकन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी गाड्या घालून शेतकऱ्यांची हत्त्या केली. या भाजप सरकारच्या विरोधात भारत बंद ची हाक देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनाच शेतकऱ्यांबद्दल काहीही आस्था नाही. आम्ही भाजप सोडून इतर पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये जर सर्वपक्ष एकत्र मिळून सन्मानाची वागणूक मिळाली तर एकत्र नायतर स्वतंत्र निवडणूक आम्ही लढवू अशी मोठे विधान केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, 50% जागा महिलांना महापालिकेत दिल्या जाणार आहेत. सोलापूर महापालिकेत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू. या महापालिका निवकणुकीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर आम्ही सोलापूरला जुने दिवस नक्कीच दाखवू, अशी माझी इच्छा आहे.

तसेच, पुणे येथील हिंजवडी, मगरपट्टा इथे IT सेंटर आल्यामुळे सर्व अर्थकारण बदलले आहे. जे हिंजवडी ला होऊ शकत ते सोलापूर ला का नाही होऊ शकत? असा मोठा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपले पालकमंत्री व्यावसायिक असल्याने त्यांना व्यवसायाचा चांगलाच अनुभव आहे.

ED बद्दलचे मोठे वक्तव्य:

निवडणुकीच्या अगोदर मला ED ची नोटीस दिली आणि महाराष्ट्राने त्यांनाच 'येडी' ठरवले आहे. शेवटी त्यांनी महापालिका निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT