Sharad Pawar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sharad Pawar: अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्या

शरद पवारांचे सर्व विरोधी उमेदवारांना आवाहन; राज ठाकरेंचेही देवेंद्र फडणवीसांना पत्र

गोमन्तक डिजिटल टीम

Sharad Pawar: अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करून योग्य संदेश द्या, असे आवाहन या निवडणुकीतील सर्वच उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधनसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. लटके यांच्या पत्नी ऋतुजा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही निवडणूक लढवणार आहेत. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ऋतुजा लटके यांच्याविरोधात भाजपचे मुरजी पटेल निवडणूक लढवत आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही पाठिंबा मिळाला आहे.

पवार म्हणाले, गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला होता आताही तशी परंपरा जपली जावी. अर्ज मागे घेण्यास वेळ आहे.

रमेश लटके यांचे विधीमंडळातील योगदान आणि उमेदवार निवडणूक येण्याचा कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, त्यामुळे राज्यात योग्य संदेश जाईल. ऋतुजा लटके यांच्याबाबत कोर्टात जाण्याची वेळ यायला नको होती. महापालिकेने हे प्रकरण कोर्टात जाण्याआधीच राजीनामा स्विकारायला हवा होता. कोर्टाने मात्र राजीनामा स्विकारण्यास विलंब करणाऱ्यांना योग्य तो संदेश दिला.

राज ठाकरेंचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचे समजते. या पत्राबाबत काही माहिती नसल्याचे पवार म्हणाले.

तर फडणवीस याबाबत म्हणाले की, राज ठाकरेंनी पत्र लिहिले आहे. त्यापुर्वी मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याकडे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. भाजपच्या उमेदवारीबाबत बोलायचे तर पक्षात मी एकटा निर्णय घेत नाही. मला याबाबत वरिष्ठांशी आणि इतर सहकाऱ्यांशी चर्चा करायला हवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT