Illegal Cattle transport In Sindhudurg Dainik Gomantak
महाराष्ट्र

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गुरांची वाहतूक रोखली; गोव्यातील गोशाळेत रवानगी, सावंतवाडी पोलिसांची कारवाई

आजरा येथील पिता पुत्राला ताब्यात घेण्यात आले.

Rajat Sawant

Illegal Cattle Transport In Sindhudurg: गुरांची अवैधरित्या होणारी वाहतूक रोखण्यात सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास बावळाट तिठा येथे करण्यात आली. कारवाईत वाहनासह पोलिसांनी 18 गुरे जप्त केली आहेत.

याप्रकरणी आजरा येथील दोघा पिता पुत्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुरांना गोव्यातील फोंडा येथील गोशाळेत पाठविण्यात आली आहे. तसेच ही वाहने कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आंबोली दुरक्षेत्राचे हवालदार जगदिश दुधवडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती काही तरुणांकडून पोलिसांना मिळाली होती. ही वाहतूक कुडाळहून आंबोलीच्या दिशेने केली जात होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी बावळाट तिठा येथे सापळा रचत ट्रक तपासणीसाठी थांबविला.

ट्रकची तपासणी केली असता त्यात तब्बल 18 गुरे असल्याचे समोर आले. गुरांची वाहतूक करणाऱ्या इसाक अब्दुल नेसरीकर आणि तौसिफ नेसरीकर दोघेही रा. आजरा. कोल्हापूर या पिता पुत्रांना ताब्यात घेण्यात आले. तर गुरे फोंडा येथील गोशाळेत पाठविण्यात आली.

गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्यांना नोटिस देवून सोडण्यात आले. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार आबा पिरणकर यांनी दिली. वाहतूक पोलिस प्रशांत धुमाळे यांनी याबाबतची तक्रार दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT