Sawantwadi Crime Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sawantwadi Crime: 'ती' आत्महत्या कौटुंबिक कारणामुळेच? मोती तलावात उडी घेणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह 17 तासांनी सापडला

Sawantwadi Motilake death: मोती तलावात गुरूवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास उडी घेतलेल्या सालईवाडा येथील रिक्षा चालक रमेश जाधव यांचा मृतदेह १७ तासांनी तलावातून सापडला.

Sameer Amunekar

सावंतवाडी: मोती तलावात गुरूवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास उडी घेतलेल्या सालईवाडा येथील रिक्षा चालक रमेश जाधव यांचा मृतदेह १७ तासांनी तलावातून सापडला. या घटनास्थळी बाबल अल्मेडा टीम तातडीने पोहून घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी पाण्यात जाऊन शोध घेत मृतदेह काही मिनिटांत बाहेर काढला.

घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि घटनास्थळावर भीती व ताणाचे वातावरण जाणवत होते. घटनास्थळी पोलीस देखील उपस्थित होते. मात्र, त्यांनी आपलं जीवन का संपवलं यावर चर्चा सुरू झाली आहे.

सध्या, रमेश जाधव यांनी आत्महत्या का केली, हे स्पष्ट नाही, मात्र स्थानिकांमध्ये कौटुंबिक कारणांमुळे ही घटना घडली असावी अशी चर्चा सुरू आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

ही घटना सावंतवाडी परिसरात धक्कादायक ठरली असून, स्थानिक लोकांमध्ये शोकाची लाट पसरली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना घटनास्थळावर जाऊन गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT