Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sanjay Raut Press Conference: 'हा ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है'

ज्या राज्यामध्ये 170 चं बहुमत आहे, त्या राज्यातील सरकारला भाजपचे (BJP) लोक पाडण्याची तारीख देत आहेत.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. एकेकाळचे सख्ये भाऊ असणारे भाजप आणि शिवसेना आत्ता पक्के वैरी झाले आहेत. शिवसेना आणि भाजपमधील राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच शिवसेनेची कमान संभाळणारे खंदे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपमधील (BJP) 'साडे तीन' नेते जेलमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता भाजपमधील ते नेते कोण, याबाबत महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले होते. (Sanjay Raut Took A Press Conference And Criticized BJP)

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनाभवनामध्ये पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत राऊत मोठे गौफ्यस्फोट करणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. भाजपमधील साडे तीन नेत्यांना आम्ही जेलमध्ये टाकू असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

केंद्रीय यंत्रणांचा मोदी सरकारकडून गैरवापर

राऊंत यांनी म्हटलंय की, भाजप सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. आरोप, खोट्या बातम्या, त्यांचा दबाव तसेच तुम्ही गुडघे टेका नाहीतर सरकार पाडू, अशा प्रकारच्या धमक्या सातत्याने दिल्या जात आहेत. ज्या राज्यामध्ये 170 चं बहुमत आहे, त्या राज्यातील सरकारला भाजपचे लोक पाडण्याची तारीख देत आहेत. ही तारीख कशाच्या आधारावर देतात? यासंदर्भात मी देशाचे उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांना पत्र लिहून केंद्रीय यंत्रणांचा कशाप्रकारे त्रास देत आहेत, याबाबत तक्रार केली आहे.

भाजप नेते धमक्या देतायेत

भाजपमधील काही नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की, तुम्ही या आघाडी सरकारमधून बाहेर पडा नाहीतर तुम्हाला बाजूला केलं जाईल. तुम्ही हे सरकार पाडण्यामध्ये आम्हाला मदत केली नाहीतर, केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईप करतील. त्यानुसार दिल्लीच्या राजकारणात याची सिध्दता देखील सुरु झाली आहे. तुम्ही आम्हाला सरकार पाडण्यामध्ये मदत नाही केली तर तुम्हाला याचा पश्चाताप होईल, असही त्यांनी म्हटलं आहे.

सूड उगविण्याचा प्रयत्न

पुढे राऊत यांनी म्हटलयं की, राज्यात सध्या पवार कुटुंबीयांना केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून टार्गेट केलं जात आहे. त्यांना देखील टाईप करु, असंही सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ईडीचे अधिकारी पवार कुटुंबीयांवर धाडी टाकू लागले. ईडीबरोबर केंद्रीय पोलिस बल तुमच्या पाठीमागे लावले जाईलं. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच माझ्यावर आणि निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी पडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT