Sanjay Raut attack on Modi government on Farm laws  Dainik Gomantak
महाराष्ट्र

'बैल कितीही हट्टी असला तरी शेतकरी ..', संजय राऊतांची मोदी सरकारवर खोचक टीका

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतल्यानंतर शिवसेनेने (Shivsena) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्याचबरोबर पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेतकरी अन्यायकारक कृषी कायद्यांविरोधात दीड वर्षांपासून आंदोलन करत होते(Farmer Protest). जमिनीची मालकी असलेल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवण्यासाठी हा कायदा आणण्यात आला असल्याची घणाघाती टीका केली आहे. जालियनबागसारखे अत्याचार करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र शेतकरी आंदोलन करत राहिले, शेतकरी पाऊस आणि ऊन सहन करत राहिले, अखेर केंद्र सरकारला शेतकऱ्यांपुढे नमते घ्यावे लागले. मात्र केंद्र सरकारचा मग्रुरी अजूनही संपलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागितलेली नाही.अशी टीका देखील त्यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. (Sanjay Raut attack on Modi government on Farm laws)

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'शेतकरी मागे हटले नाहीत. 13 राज्यांच्या निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. पुढे उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभेच्या निवडणुका हरण्याची भीती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेतले असल्याचे विधान देखील संजय राऊत यांनी यावेळी केले आहे.

तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बहाण्यावरून संजय राऊत यांनी कंगना राणौतवरही निशाणा साधला आहे. कंगना राणौत म्हणाली होती की, 1947 मध्ये देशाला भीक मागून स्वातंत्र्य मिळाले. खरे स्वातंत्र्य 2014 नंतरच मिळाले. यावर सडकून टीका करत संजय राऊत म्हणाले की, शेतकरी आंदोलनाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले असून ते भीक मागून नाही तर लढून मिळवले आहे.

'बैल कितीही हट्टी असला तरी शेतकरी शेत नांगरतोच - संजय राऊत'

यापूर्वी संजय राऊत यांनी आज एक ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'बैल कितीही हट्टी असला तरी शेतकरी शेत नांगरायला घेतो, जय जवान, जय किसान!'

आणि या ट्विट द्वारे त्यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT