Nawab Malik

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

'समीर वानखेडेंच्या बेकायदेशीर कामाचा पाठपुरावा करणार': नवाब मलिक

महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी माध्यमाशी बोलताना समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचा मुंबई एनसीबीमधील कार्यकाळ संपला होता. आता त्यांना DRI (Directorate of Revenue Intelligence-DRI) विभागाकडे पाठवण्यात आले आहे. मुंबई एनसीबीमध्ये झोनल डायरेक्टर पदावर येण्यापूर्वी समीर वानखेडे या विभागात होते. डीआरआय विभागातूनच त्यांना मुंबई एनसीबीमध्ये आणून झोनल डायरेक्टर करण्यात आले. आता त्यांना पुन्हा डीआरआयकडे पाठवण्यात आले आहे. यातच आता महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमाशी बोलताना समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी माध्यमाशी बोलताना मलिक म्हणाले, समीर वानखेडे यांची बदली करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. एखादा अधिकारी मर्यादेच्या पुढे जाऊन कार्य करत असेल तर त्याच्यावर कारवाई होणे आपेक्षित असते. त्याचबरोबर समीर वानखेडेंच्या कामाचा आम्ही पाठपुरावा देखील करणार आहोत. तसेच वानखेडे यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी हा घेतलेला निर्णय योग्य आहे. त्याचबरोबर माझ्याविरोधात असलेल्या कोणत्याही तक्रारीला मी सामोरे जाण्यासाठी तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT