Mumbai Police Commissioner Dainik Gomantak
महाराष्ट्र

'15 दिवसात तपास पूर्ण करु': मुंबई पोलिस आयुक्त

मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष यांनीही घटनास्थळाला भेट दिली आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस अधिकारी घटनास्थळाला भेट देणार आहेत.

दैनिक गोमन्तक

साकीनाका प्रकरणाबाबत माध्यामांमध्ये अंदाज बांधून घटनेचा अर्थ लावला जात आहे. पीडीत महिला एका विशिष्ट समाजाची आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती. दरम्यान त्याने संपूर्ण गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 15 तारखेपर्यंत तो अटकेत आहे. गुन्हा कसा घडला? गुन्हा घडल्यानंतर आरोपी कसा घटनास्थळावलरुन गेला? त्यासंबंधीची माहिती प्राप्त झालेली आहे. हा अत्यंत संवेदनशील गुन्हा असल्यामुळे राज्यातील प्रसिध्द वकिल राजन ठाकरे या तपासादरम्यान मार्गदर्शन करत आहेत.

एका महिन्याच्या आत गुन्ह्याची पडताळणी करण्यात येईल. दरम्यान, दिल्लीवरुन नॅशनल कमीशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष यांनीही घटनास्थळाला भेट दिली आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस अधिकारी घटनास्थळाला भेट देणार आहेत. 20 लाखाची मदत पिडीत व्यक्तीच्या सदस्यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकिय इतर मदतही देण्यात येणार आहे.

तसेच, 10 तारखेच्या मध्यरात्री साकीनाका येथील एका कंपनीमधील वॉचमने फोनद्वारे पोलिस कंट्रोल रुमला कळवले. त्यावेळी मुबंई पोलिस काही वेळातच पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ पिडितेला राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल केले. या चौकीदाराच्या तक्रारीवरुन या नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर क्राईम ब्रॅंचचे अधिकारी कामाला लागले. आरोपीचे नाव मोहन असून त्याला संशयावरुन ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याचे कपडे ताब्यात घेण्यात आले. 21 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे. पुढील एक महिन्याच्या आत हा गुन्हा उघडकीस आणून हा तपास पूर्णपणे संपवला जाईल. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. काही संभ्रम यासंबंधी होता, त्यामध्ये चार आरोपी आहेत. मात्र तपासादरम्यान एकच आरोपी निष्पन्न झाला आहे. यामध्ये जी पीडीत आहे तिचा जबाब नोंदवता आला नाही. मात्र तपासादरम्यान अधिक माहिती घेता येईल. तसेच हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT