Sanjay Raut
Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

'24 तासात परत या, महाविकास आघाडी सोडण्याचा विचार करु' : संजय राऊताचं मोठं वक्तव्य

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सर्व बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेचे दोन बंडखोर आमदार परतल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, शिवसेनेचे बंडखोर आमदार 24 तासात परत आल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करु.

संजय राऊत म्हणाले - उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी परतणार आहेत

एवढंच नाही तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकरच मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी परततील याची आम्हाला खात्री आहे, असेही राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'आमच्या आमदारांचे अपहरण झाले आहे. गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांपैकी 21 आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना परत यायचे आहे.'

दरम्यान, सुरतमधील एकनाथ शिंदे यांच्या कॅम्पमधून बाहेर पडलेले आमदार नितीन देशमुख म्हणाले की, 'यापूर्वीही अनेकदा सरकार पाडण्याचे कारस्थान झाले आहे. काही लोक हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत. सरकारमधील काही गोष्टी पटत नसतील त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगायला पाहिजे होते. मात्र इथे बोलण्याऐवजी ते काही आमदारांसह पळून गेले. महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे तीच दाखवावी, अशी आमची माध्यमांकडे मागणी आहे.'

एकनाथ शिंदे गटाने व्हिडीओ जारी करुन ताकद दाखवली

त्यांच्याशिवाय दुसरे आमदार कैलास पाटील म्हणाले की, मला सुरतमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटानेही व्हिडिओ जारी करुन पाठिंबा दिला आहे. त्यात 42 आमदार दिसत असून, 'एकनाथ शिंदे संघर्ष करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' अशा घोषणा देत आमदार ताकद दाखवत आहेत. एवढ्या मोठ्या बंडखोरीनंतरही शिवसेनेकडून (Shiv Sena) एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर कठोर शब्दात टीका केली जात नाहीये. यावरुन शिवसेनेने भूमिका मवाळ घेतली असून त्यांना एकनाथ शिंदे गटाला परत आणायचे आहे, हे स्पष्ट आहे. तत्पूर्वी बुधवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनीही भावनिक भाषण करत बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे.

शरद पवारांनीही हार स्वीकारली- म्हणाले, संघर्षाला तयार राहा

या राजकीय संकटामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही (Congress) खळबळ उडाली आहे. आज राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार म्हणाले की, सरकार वाचवण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत. बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले की, आम्हाला फारशी माहिती नाही. काल संध्याकाळी पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करु. याशिवाय सत्तेबाहेर राहण्यासाठी संघर्षासाठी तयार राहा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Goa Today's Live News Update: ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, मोन्सेरात पॅनल विजयी

Sattari Farmer : काजूला २५० रु. आधारभूत किंमत द्या : सत्तरीतील बागायतदार

Highest FD Interest Rates: FD धारकांसाठी आनंदाची बातमी, PPF-सुकन्या समृद्धी पेक्षा 'या' बँका देतायेत जास्त व्याजदर

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

SCROLL FOR NEXT