Uddhav Thackeray Dainik Gomantaak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, रामदास कदमांची शिवसेनेला सोडचिठ्ठी

Maharashtra News: शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्षाच्या आणखी एका नेत्याने मोठा धक्का दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Former Chief Minister Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्षाच्या आणखी एका नेत्याने मोठा धक्का दिला आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली आहे. ते उद्धव ठाकरे गटात होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले.

दरम्यान, हे वृत्त अशावेळी आले आहे, जेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मुंबई (Mumbai), पालघर, यवतमाळ, अमरावतीसह इतर अनेक जिल्ह्यांत त्यांनी शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या दरम्यान उपविभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख पदांवर मोठ्या प्रमाणात नवे चेहरे आणण्यात आले आहेत. पक्षाने आपले मुखपत्र सामनामध्ये नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात 20 जुलै रोजी याचिकांवर सुनावणी होणार

त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर 14 शिवसेना आमदार (Member of Legislative Assembly) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. या याचिकेत विधानसभेच्या उपसभापतींनी सुरु केलेल्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान देण्यात आले आहे.

दुसरीकडे, सरन्यायाधीश एन वेंकट रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ बुधवार, 20 जुलै रोजी याचिकांवर सुनावणी करणार आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचाही समावेश आहे.

शिवाय, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातही सुनावणी होणार आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे गटाने नामनिर्देशित केलेल्या व्हीपला शिवसेनेचा मुख्य व्हीप म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

SCROLL FOR NEXT