स्वप्नील वडगेरी Dainik Gomantak
महाराष्ट्र

पुण्यातील युवकाचे 'हटके' रक्षाबंधन

कुणी देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना तर कुणी निसर्गाचे रक्षण करणाऱ्या झाडांना राखी बांधून त्यांचे आभार मानत आहे.

दैनिक गोमन्तक

आज देशभरात रक्षाबंधन (Rakshabandhan) सजारे केले जात आहे. कुणी देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना तर कुणी निसर्गाचे रक्षण करणाऱ्या झाडांना राखी बांधून त्यांचे आभार मानत आहे. असाच एक अनोखा उपक्रम पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये दुग्ध व्यवसाय करणाऱ्या 'स्वप्नील वडगेरी' या 28 वर्षांच्या युवकाने देखील केला आहे. त्याने कोरोना योध्यांना राखी बांधून या वर्षीचे रक्षाबंधन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे केले.

दुधाच्या बाटली राखी

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता पत्रकार, डॉक्टर, पोलीस कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते हे लोकांमध्ये जनजागृती करून त्यांना वाचवण्याचे काम करत होते. म्हणूनच त्यांच्या या कामाची जाणीव लक्षात घेऊन या कोरोना योध्यांना दुधाच्या बाटलीला राखी बांधून त्याने रक्षा बंधन साजरे केले. त्याचप्रकारे या राखीवर त्याने सर्वांसाठी संदेश ही लिहले.

दुधाच्या बाटली राखी

स्वप्नील म्हणतो, आपण जेव्हा समाजात वावरत असतो किंवा काम करत असतो, तर ज्यांच्या मुळे आपण हे काम करू शकतो आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. रक्षा बंधन हा सण फक्त भाऊ बहिणीचाच सण नसून तो ज्यांच्यामुळे आपले रक्षण होते अशा रक्षकांचा देखील सण आहे.मी एक दुग्ध व्यावसायिक आहे आणि कोरोनाच्या काळात झालेला त्रास,आर्थिक हाल याची मला जाणीव आहे. परंतू आज आपण सर्व सुरक्षित आहोत त्या कोरोना योध्यांच्या बलिदानाचा आपल्याला विसर पडता कामा नये. या कठीण काळात सातत्याने समाज आणि सरकार यांच्या मधला संवाद चालू ठेवल्या बद्दल मी सर्व पत्रकारांचा आभारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT