raj thackeray canceled plans read hanuman chalisa front mosques tomorrow Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरेंनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाचण्याचा प्लॅन केला रद्द, कारण...

राज ठाकरेंनी उद्या मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा प्लॅन केला रद्द

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत मशिदींसमोरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिला होता. रविवारी त्यांनी औरंगाबादच्या सभेत सांगितले होते की, सर्वांनी ईद आनंदाने साजरी करावी, मात्र 4 मे रोजी कोणाचेही ऐकणार नाही. मात्र आता राज ठाकरे यांचे वक्तव्य आले आहे. यामध्ये त्यांनी उद्या मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा बेत रद्द केला आहे. (raj thackeray canceled plans read hanuman chalisa front mosques tomorrow)

राज ठाकरे म्हणाले की, उद्या ईद आहे. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा झाला पाहिजे. उद्या मनसेचा एकही कार्यकर्ता हनुमान चालीसा वाचणार नाही. यासोबतच 4 मे रोजी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाचल्यानंतर काय करायचे ते सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय घडामोडी मागील काही दिवसांपासून लाऊडस्पीकर वादाभोवती फेर धरत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील राजकारण हदरवून सोडले होते. यानंतर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले.

दरम्यान, लाऊडस्पीकरच्या मुद्याने महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील राजकारण ढवळून निघालं. या मुद्यावरुन राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरली असल्याचा आरोप देखील राजकीय विरोधकांकडून करण्यात आला. जोपर्यंत मशिदीवरुन लाऊडस्पीकर हटवले जात नाहीत, तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही, असे आवाहन राज ठाकरेंनी राज्य सरकारलं केलं होतं. त्यानंतर सत्ताधारी नेते आणि मनसेमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या. राज ठाकरे भाजपची बी टीम असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून राज ठाकरे यांच्यावर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT