raj thackeray aurangabad sabha live updates marathi news mns rally on 1st may maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी बजरंग दलाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अनेक प्रश्न प्रलंबित; राज ठाकरे

दैनिक गोमन्तक

भाजप व अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा मिळत असतानाच आता कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मोठा निर्णय घेतला आहे. बजरंग दल आणि विहिंपने राज ठाकरे यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा नसल्याचे जाहीर केले आहे. राज ठाकरे यांच्या हनुमान चालीस पठणाला आमचा पाठिंबा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या उपक्रमात बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी होणार, या निव्वळ अफवा असल्याचे विनोद बन्सल यांनी स्पष्ट केले आहे. (raj thackeray aurangabad sabha live updates marathi news mns rally on 1st may maharashtra)

दरम्यान, संभाजीनगर हा महाराष्ट्राचा मध्य आहे. यापुढील माझ्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रासमोर आज अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळेच राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

छत्रपतींचा जन्म झाला महाराष्ट्रचं दार उघडलं. स्वाभिमानाने कसं जगायचे हे आमच्या राजानं शिकवले आहे. केवळ 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी भव्य काम केले. जे इतिहास विसरले आहे त्यांचा भूगोल सटकला आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

मला सर्व विषयांची आणि समस्यांची कल्पना आहे. संभाजीनगरचं मूळ नाव खडकी होते. दोन्ही राजधानी इथल्याच महाराष्ट्र दिन समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्र समजून घ्या जो इतिहास विसरला तर त्याच्या पायखालचा भूगोल सटकला. या महाराष्ट्राने देशाला काय काय दिलं हे आठवण्याची गरज आहे. अस मत राज ठाकरे यांनी जाहीर सभेत मत मांडले. तसेच मोठ्या निवडणुकांसह ग्रामपंचायती जिंकण्याचा मनसेचा निर्धार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sonam Wangchuk Hunger Strike: "मी भूत बनून परत येईन...", सोनम वांगचुक यांचा थेट इशारा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम

Sohail Khan: 'माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, पण भीतीमुळे कुणालाही सांगितलं नाही'; सोहेल खानचा धक्कादायक खुलासा

Goa Monsoon: गोव्यात पावसाचं कमबॅक! सत्तरीतील रस्ते जलमय, मुसळधार सरींमुळे बळीराजा सुखावला

VIDEO: 'घरातील गॅस सिलेंडर सुरु केला अन् थेट शेगडीवरच...', सोशल मीडियावर जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकऱ्यांनी पठ्ठ्याला घेतलं फैलावर

Viral Video: वापरलेली भांडी, अन्नाचा कचरा अन् रिकाम्या पॅकेट्सचा खच! गोव्यातील Airbnbचा व्हिडिओ व्हायरल, पर्यटकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT