raj thackeray aurangabad rally uddhav thackeray shiv sena bjp devendra fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सभेत गडबड, ठाकरी शैलीत दिला इशारा

ही मनसेची सभा आहे, चौरंग करुन घरी पाठवेन

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय पेच आहे. लाऊडस्पीकरच्या लढाईत राज ठाकरे बोलके झाले आहेत. त्यामुळेच मनसे प्रमुखांची आज औरंगाबादमध्ये सभा होत आहे. यावेळी ते म्हणाले की, माझ्या आजच्या मेळाव्याबाबत विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. एवढा गदारोळ का होतोय समजत नाही. दरम्यान, सभास्थळी जराशी गडबड झाली. प्रेक्षकांमधून आवाज यायला लागला. त्यावेळी राज ठाकरेंनी आपलं भाषण थांबवून गडबड करणाऱ्यांना इशारा दिला. माझ्या सभेत गडबड करायला कुणी टाळकी असेल तर कार्यकर्त्यांनो तिथल्या तिथे हाणा. ही मनसेची सभा आहे, चौरंग करुन घरी पाठवेन, असा ठाकरी शैलीत राज ठाकरेंनी इशारा दिला. (raj thackeray aurangabad rally uddhav thackeray shiv sena bjp devendra fadnavis)

दरम्यान, यावेळी बोलताना लाऊडस्पीकरचा हा मुद्दा जुना आहे. माझ्याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे. मी मशिदीवरच्या भोंग्याला हनुमान चालीसाचा फक्त त्याला पर्याय दिला आहे. मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.

सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत माझ्या जाहीर सभांमुळे सरकारला धक्का बसला आहे. या सभेत मनसे अध्यक्षांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, शरद पवारांचा पक्ष समाजात द्वेष पसरवत आहे. शरद पवारांच्या मुलीने एकदा सांगितले होते की त्यांचे वडील नास्तिक आहेत. मला माझ्या आजोबांबद्दल सांगू नये असेही सांगितले. सभेत राज ठाकरे म्हणाले की, मी मुंबईत गुढीपाडव्याला सभा केली, त्यानंतर अनेकांनी माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर ठाण्यात झालेल्या बैठकीत मी त्याचे उत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडमध्ये! नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली 'महा बैठक'; विजयाचा ठरणार रोडमॅप

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: वास्कोतील शिवपुतळा हटवण्याचा अंतरिम आदेश कायम, उच्च न्यायालयाकडून अर्जदारांची याचिका नामंजूर; ठोठावला 4 लाखांचा दंड!

Mandovi Bridge Accident: ओव्हरटेक बेतलं जिवावर! मांडवी पुलावर टॅक्सी आणि दुचाकीचा भीषण अपघात; मुंबई आणि रोहतकच्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Horoscope: धनलाभाचे योग आणि जुनी गुंतवणूक ठरणार फायदेशीर! पैशांच्या बाबतीत मंगळवार 'या' राशींसाठी भाग्याचा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

SCROLL FOR NEXT