police Suspende Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंब्रा भागात व्यापाऱ्याच्या घरावर छापा; 10 पोलीस निलंबित

तीन पोलीस अधिकाऱ्यांसह सात अन्य पोलिसांचा समावेश

दैनिक गोमन्तक

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी एका खेळणी व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकत 6 कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाबाबत गृहमंत्रालयाला पत्र लिहिल्यानंतर ही बाब समोर आली आहे. ( Raid on merchant's house in Mumbra area; 10 police suspended )

या कारवाईत एकाच पोलीस स्टेशनचे 10 पोलीस निलंबित झाल्याने मुंब्रा पोलीस ठाणं रिकामं झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ठाणे पोलीस दलामध्ये ही मोठी खळबळ उडाली आहे. 12 एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास मुंब्रा पोलिसांनी त्यांच्या घरी छापा टाकल्यानंतर व्यापाऱ्याच्या घरात 30 कोटींची रोकड आढळली. प्रत्येक बॉक्समध्ये एक कोटी प्रमाणे पोलिसांनी सर्व बॉक्स मुंब्रा पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी खेळणे व्यापारी फैजल मेमन यांना दमदाटी करून 30 कोटीं पैकी 6 कोटी रुपये उकळले, असा आरोप गृहमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, रवी मदने, हर्षल काळे आणि पोलीस नाईक पंकज गायकर, जगदीश गावित, दिलीप किरपण, प्रवीण कुंभार, अंकुश वैद, ललित महाजन आणि नीलेश साळुंखे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावं आहेत.

निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.हे प्रकरण थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गेल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

Ponda Water Problems: फोंड्यात 15 दिवसांत पुरेसे पाणी मिळणार? जनता दरबारात सुभाष शिरोडकरांचा शब्द

Gold Mine Accident: "मदतीसाठी आक्रोश अन् चिखलाने माखलेले मृतदेह!" सोन्याची खाण ठरली मृत्यूचा सापळा; 30 जणांचा मृत्यू

Mandovi River Pollution: मांडवी नदी प्रदूषणावर हायकोर्टात सुनावणी; खाडी परिसरातील प्रत्येक आस्थापनाची तपासणी करण्याची सूचना

Goa Crime: कला अकादमी कंत्राटदाराची आत्महत्या; 45 लाखांच्या थकबाकीवरून कंपनीच्या दोघांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT