Crime News  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: गर्भधारणा होण्यासाठी सासरच्या लोकांनी सुनेला खायला लावली स्मशानातली राख

Maharashtra: एका महिलेला गर्भधारणा व्हावी म्हणून स्मशानातली राख खायला लावल्याची घटना पुढे आली आहे. एका तांत्रिकाने स्मशानातली राख खाण्याचा उपाय सांगितला होता.

दैनिक गोमन्तक

Maharashtra: पुण्यातला एक अमानुष प्रकार समोर आला आहे. एका महिलेला गर्भधारणा व्हावी म्हणून स्मशानातली राख खायला लावल्याची घटना पुढे आली आहे. एका तांत्रिकाने स्मशानातली राख खाण्याचा उपाय सांगितला होता.

तांत्रिकाने सांगितलेल्या उपायानुसार सासरच्या लोकांनी आणि पतीने आपल्याला जबरदस्तीने राख खायला लावली अशी तक्रार एका विवाहितेने पोलिसात दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर सिंहगड पोलीसांनी पीडीतेचा नवरा, सासरची मंडळी आणि एका तांत्रिकासह सात जणांवर प्राथमिक गुन्ह्याची नोंद केली आहे.

पोलीसांनी आईपीसी च्या धारा 498 ए, 323, 504, 506 धारा लावल्या आहेत.त्याचबरोबर या सात लोकांविरोधात अमानवीय, दुष्ट आणि अघोरी प्रथा आणि काला जादू अधिनियम, 2013 अंतर्गतसुद्धा गुन्ह्याची नोंद केली आहे. याबरोबरच पीडीतेने विवाहाच्यावेळी हुंडा मागितल्याचा आरोपसुद्धा लावला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडीतेच्या सासरच्यांनी काही अंधविश्वासी विधीमध्ये जबरदस्तीने सामील केले आणि त्यानंतर तिला स्मशानातली राख खाण्यास सांगितले आहे. जिथे या प्रथा केल्या त्या स्मशानाचा आम्ही तपास सुरु केला आहे.

तपासानंतर या संपुर्ण घटनेचा तपशील समोर राहील त्यानंतर आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस( Police ) अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान,मिळालेल्या माहितीनुसार पीडीतेच्या सासरचे लोक शिक्षित आहेत. मात्र अशा अंधश्रद्धावर विश्वास ठेवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT