Dehu Temple Dainik Gomantak
महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार तुकाराम महाराजांच्या शिळामंदिराचे लोकार्पण

देहू परिसरात लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

दैनिक गोमन्तक

जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांना भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य लाभले आहे.या श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळामंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्षेत्र देहू येथे येत्या 14 जूनला येणार आहेत. त्या निमित्ताने मंदिरात आणि देहू परिसरात जय्यत तयारी सुरू आहे. ( Prime Minister Modi will inaugurate the Tukaram Maharaj Temple )

20 जूनला तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यापूर्वी पंतप्रधान देहू येथे येणार आहेत. त्यामूळे लोकार्पण सोहळ्याची तयारी वेगाने सुरु आहे. देहूतील मुख्य मंदिरामध्ये दगडात कोरीव काम करून साकारण्यात आलेल्या या शिळामंदिराची पायाभरणी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना झाली होती. त्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, असा संस्थानचा आग्रह होता. त्यादृष्टीने 29 मार्च 2022 रोजी पंतप्रधानांना निमंत्रण देण्यासाठी संस्थानचे विश्वस्त मंडळ दिल्लीत गेले होते. त्यानुसार या कार्यक्रमासाठी 14 जूनची तारीख निश्चित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचा दिवस अगदी दोन ते तीन दिवसांवर आल्याने देवस्थानकडून त्याची मोठ्या जोमाने तयारी सुरू आहे. मुख्य मंदिरातील काही कामे पूर्ण करण्यात येत असून, त्याची सजावटही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा सभामंडपही उभारण्यात आला आहे. पोलिसांसह जिल्हा प्रशासनही या कार्यक्रमासाठी सज्ज झाले आहे. त्यामूळे देहू संस्थानाची इच्छा आता पुर्ण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT