Nagpur Dainik Gomantak
महाराष्ट्र

पाठलाग! मग किराणा दुकानदाराच्या बाबतीत घडलं तरी काय?

तीन दिवस व्यापाऱ्यांची जाण्यायेण्याच्या मार्गापासून तर त्यांच्या दुकाना पर्यंत तपास केला आणि चौथ्या दिवशी दुकानदाराची लूट केली.

दैनिक गोमन्तक

तीन दिवस व्यापाऱ्यांची (Merchant) जाण्यायेण्याच्या मार्गापासून तर त्यांच्या दुकाना पर्यंत तपास केला आणि चौथ्या दिवशी दुकानदाराची लूट केली. नागपूरच्या (Nagpur) पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रीच्या अंधाराचा आरोपीने याचा फायदा घेतला. या प्रकरणात तीन आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्यातील दोन फरार आहेत. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत गणेश ट्रेडर्स नावच मोठं किराणा दुकान आहे, तिथे तीन आरोपी काही तर खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात जायचे. दुकानदाराची दिनचर्या काय आहे, याची माहिती त्यांनी काढली होती. दुकानदाराचा गल्ला किती, तो कोणत्या मार्गाने रात्री घरी जातो याबाबतची सर्व माहिती तीन आरोपींनी घेतली. तीन दिवस पाठलाग केला आणि चौथ्या दिवशी प्लान आखला. (Planned and robbed the grocery shopkeeper)

दुकानदाराने (shopkeeper) दिवसभराचा विक्रीचा पैसा एकत्र केला आणि दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन तो घरी जायला निघाला. मात्र त्याच्या मागावर असलेल्या आरोपीने त्याला पाचपावली पुलाच्या खाली अडवले. चाकूचा धाक दाखवत त्याची दुचाकी घेऊन तिथून पळ काढला. पोलिसांनी तपास सुरू करत एका आरोपीला अटकही केली. मात्र दोन आरोपी अजूनही फरार आहेत तर तिन्ही आरोपी कुख्यात आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पाचपावलीचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.

या घटनेमुळे मात्र परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे, तर पाचपावली परिसरातील व्यापारी सुद्धा धास्तावले आहेत. नागपूर शहरात खुनाच्या घटना कमी झाल्या असल्या तरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा या चोरट्यांवर वचक बसविण्यासाठी पोलीस काय उपाययोजना करतात, हे पाहावं लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT