Onion Prices Fall, Onion Prices News Updates, Onion Rate News updates Dainik Gomantak
महाराष्ट्र

Onion Prices Fall: वातावरणातील बदलामुळं कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आला आहे.

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाचे वातावरण दिसत आहे. यामुळे या वातावरणाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. यंदा एन हंगामात कांदा, आंबा या पिकांच्या लागवडीवर अधिक परिणाम होत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात कांदा काढणीला वेग आला असून यावर अवकाली वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे. सध्या बाजारात कांद्याला (Onion) मातीमोल भाव मिळत असल्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याची स्थिती आहे. (Onion Prices News Updates)

दरम्यान या अवकाली वातावरणामुळे कांद्याच्या उत्पन्नात निम्यान घट झाली आहे. दरवर्षी साधारण उत्पन्न एकरी अठरा टनापेक्षा जास्त होते. पण यंदा कांद्याच्या उत्पन्नात निम्यान घट झालेली दिसत आहे. खर्च वाढल्याने किमान मिळकत तरी होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना (Farmer) पडला आहे. बाजार समितीने जे कांद्याला 1 हजार 200 ते 1 हजार 300 रुपयांचा दर मिळत असला तरी जागेवर 700 ते 800 रुपयांचा दर मिळत आहे. यातच उत्पन्न घटल्याने आणि खर्चात वाढ झाल्याने शेतकरी चिंतेत आले आहे.

या भागात कांद्याची काढणी बाकी आहे. सर्व शेतकऱ्यांचा कांदा काढून पुढील महिन्यात होईल असा अंदाज आहे. यामुळे पुढील मअहिन्यात मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येईल आणि भावात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये भरीस भर म्हणून वातावरणाचा परिणामही शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: ईशान किशन ठरला 'हिरो', गोलंदाजांनी मोडलं पाकड्यांचं कंबरडं; हायहोल्टेज सामन्यात भारताचा 61 धावांनी दणदणीत विजय

IND vs PAK: पाकड्यांची ना बॅालिंग चालली, ना बॅटिंग! टीम इंडियाच्या 'डबल अटॅक'ने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, 61 धावांनी पराभव

IND vs PAK: 'भारत जादूटोणा करुन जिंकतो...', पाकिस्तानी क्रीडा विश्लेषकाचा अजब दावा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वर्ल्ड कपमध्येही तेच रडगाणं

IND vs PAK: युवराजचा रेकॉर्ड मोडला, कोहलीच्या क्लबमध्ये एन्ट्री! ईशान किशनचा पाकिस्तानविरुद्ध धमाका; बनला नवा 'सिक्सर किंग'

VIDEO: 10 चौकार 3 षटकार... खतरनाक ईशान किशन! पाकड्यांना धु धु धुतलं, तुफान फटकेबाजी व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT