Goa Express
Goa Express 
महाराष्ट्र

पाणी पिण्याचा वाद जिवावर बेतला; गोवा एक्सप्रेसमधून दिलं मित्राला ढकलून

गोमन्तक वृत्तसेवा

केडगाव: हल्ली वादाचे आणि भांडणाचे प्रमाण वाढले आहे. घरी दारी भांडण होत असतांना आता रेल्वेतही(Railway) दोरदार भांडण व्हायला लागले आणि आश्चर्य काय तर या भांडणातून फिल्मी क्राइम(Crime) सिनच झाला. सोमवारी रेल्वे प्रवासात दोन मद्यपी प्रवाशांमध्ये पाणी पिण्यावरुन वाद झाला. या वादातून एका व्यक्तीला अक्षरश: धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. या घटनेमध्ये प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. ही  घटना सोमवारी (दि.14) रोजी घडली. केडगाव स्थानकावर हा प्रकार घडली असून याप्रकरणी आरपीएफ पोलीसांनी एकाला अटक केली आहे.

गोवा एक्सप्रेसमध्ये झाला वाद

गजानन राठोड (वय-33 रा. हिंगोली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव होते. तर नितीन दीपक जाधव (वय-21 रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) या तरूणाने हे कृत्य केल्याने त्याला आरपीएफ पोलिसांनी(RPF) अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत राठोड आणि आरोपी नितीन जाधव हे दोघे गोवा एक्सप्रेस (Goa Express) (गाडी क्रमांक 02780) च्या जनरल डब्यातुन प्रवास करत होते. हे दोघेही दारू दारूच्या नशेत प्रवास करत होते.

पाणी पिण्यावरुन झाला वाद
गोवा एक्सप्रेस मधून प्रवासादरम्यान दोघांची ओळख झाली. आणि काही क्षणातच दोघांमध्ये पिण्याच्या पाण्यावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी  जाधव याने राठोडला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकून दिले.राठोड समोरच्या डाऊन ट्रॅकवर जावून आदळला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने  गजानन राठोडचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न
राठोड याला धावत्या रेल्वेतून फेकून  दिल्यानंतर घाबरलेल्या नितीन जाधवने पळून जाण्याचा प्रयत्न केला. या आरोपीने पळून जाण्यासाठी डब्यातील चेन ओढून रेल्वे थांबवली. त्यावेळी ड्युटीवर असलेले आरपीएफ कर्मचारी विठ्ठल भोसले यांनी पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करुन त्याला अटक केली.
या प्रकरणाबाबत आरोपीकडे चौकशी केली असता त्याने ट्रेनमध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला. आणि त्यानंतर केडगाव रेल्वे पोलिसांनी ने आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT