Omkar Elephant Dainik Gomantak
महाराष्ट्र

Omkar Elephant: 'ओंकार' हत्ती अखेर पोहोचला कळपाजवळ, मोर्लेपर्यंत मजल; वनविभागाचे हालचालींकडे लक्ष

Omkar Elephant Update: तिलारी परिसरात चर्चेचा विषय ठरलेला ओंकार हत्ती आपल्या कुटुंबाच्याजवळ पोहोचला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

दोडामार्ग: तिलारी परिसरात चर्चेचा विषय ठरलेला ओंकार हत्ती आपल्या कुटुंबाच्याजवळ पोहोचला आहे. तो आपल्या मूळ कळपाकडे जाणार असल्याने तेथील शेतकऱ्यांत मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून ओंकार वेगळ्या भागात असल्याने त्याच्या हालचालींकडे वन विभागासह नागरिकांचेही लक्ष लागले होते.

ओंकार हत्ती बांदा परिसरात मानवी वस्तीच्या आसपास भटकत होता. शेतीचे नुकसान करीत असला तरी त्याठिकाणी त्याला ''सेलिब्रिटी''सारखी वागणूक दिली जात होती; मात्र परिस्थिती चिघळू न देता वन विभागाने संयमाने पावले उचलली.

ओंकारच्या वर्तनाचा अभ्यास, त्याच्या हालचालींचे निरीक्षण आणि नैसर्गिक मार्गांचा वापर करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यामुळे ओंकार आता पुन्हा आपल्या कुटुंबात सामील होणार आहे.

कळपापासून दुरावलेला हत्ती एकटाच भ्रमंती करीत होता. दरम्यान, तिलारी खोऱ्यात असलेला कळप घाटमाथ्यावर पोहोचला होता; मात्र काही दिवसांपूर्वी तो पुन्हा माघारी फिरला आहे. सध्या या कळपाचा वावर हेवाळे परिसरात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT