Court Extended Nawab Maliks Judicial Custody Dainik Gomantak
महाराष्ट्र

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयीन कोठडी 20 मे पर्यंत वाढली

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत आता 20 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणात एमपीएमएलए कोर्टाने नवाब मलिकच्या खटल्याची सुनावणी करताना 6 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. (Court Extended Nawab Maliks Judicial Custody)

दाऊद इब्राहिमसोबतच्या संबंधांमुळे आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी मलिकांना अटक करण्यात आली आहे. सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. नवाब मलिक सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी कोठडीत असून त्यांची कोठडी आज संपत होती. मलिकांना 23 फेब्रुवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती.

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या लोकांशी संबंध असल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. मलिकांवर दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा देखील आरोप केला आहे. हे प्रकरण फरार गुंड दाऊद इब्राहिमच्या जवळच्या साथीदारासोबत मलिकांच्या संपत्तीच्या व्यवहाराशी संबंधित आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT