Nawab Malik: International Drugs paddler Sameer Wankhede's friend Twitter @ANI
महाराष्ट्र

'समीर वानखेडेंचे संबंध अंतराष्ट्रीय ड्रग्स माफीयासोबत' नवाब मालिकांचा गंभीर आरोप

या पत्रकार परिषदेत त्यांनी आज समीर वानखेडे, किरण गोसावी,वानखेडेंचा ड्राइव्हर आणि प्रभाकर यांचा CDR तपासा म्हणजे सत्य समोर येईल अशी विनंती NCB ला केली आहे.

दैनिक गोमन्तक

आर्यन खान प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे अडचणीत आलेले दिसत आहेत. कारण राष्टवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) रोज काहीतरी नवीन गोपयस्फोट करत आहेत. ट्विट करत आणि पत्रकार परिषद घेत ते समीर वानखेडे यांच्यावर आरोपीच्या फैरी झाडत आहेत. आजही तीच मालिका सुरू ठेवत नवाब मलिक यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आहे. (Nawab Malik: International Drugs paddler Sameer Wankhede's friend)

या पत्रकार परिषदेत त्यांनी आज समीर वानखेडे, किरण गोसावी,वानखेडेंचा ड्राइव्हर आणि प्रभाकर यांचा CDR तपासा म्हणजे सत्य समोर येईल अशी विनंती NCB ला केली आहे.त्याचबरोबर त्यांनी NCB ला एक निनावी पत्र आलं होतं ज्यात गंभीर आरोप होते मात्र ते दुर्लक्षित केलं गेलं असेही त्यांनी सांगितले आहे.

श्रद्धा कपूर, सारा आली खान दीपिका पदुकोण यांसारख्या अभिनेत्रींची चौकशी झाली मात्र पुढे काहीच झालं नाही हे नेमकं प्रकरण काय आहे ? असा सवाल देखील मालिकांनी यावेळी विचारला आहे.

त्याचबरोबर मुंबईत त्या रात्री झालेल्या क्रूज पार्टीत एक अंतराष्ट्रीय ड्रग्स माफीया होता मात्र तो NCB ला कसा सापडला नाही असे म्हणत CCTV चेक करा म्हणजे साऱ्या गोष्टी समोर येतील असा इशाराही मालिकांनी या पत्रकार परिषद दिला आहे. तसेच समीर वानखेडेंचे संबंध अंतराष्ट्रीय ड्रग्स माफीयासोबत आहेत असा हल्लबोल देखील नवाब मालिकांनी कला आहे. त्याचबरोबर समीर वानखेडे आता त्यांच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबाला धमकावत आहेत असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान मी प्रसिद्ध केलेलं समीर वानखेडे यांचं बर्थ सर्टिफिकेट खरं आहे त्यांच्या वडिलांचं नाव दाऊदचं, आणि मी माझ्या विधानावर ठाम आहे असा पुर्नउच्चार देखील त्यांनी केला आहे त्याचबरोबर हे कागद मिळवण्यासाठी मी दीड महिने घातले असल्याच देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.वानखेडे यांनी खोटे कागदपत्र दाखवत नौकरी मिळवली आहे, आणि अशी नोकरी मिळवत त्यांनी एका दलिताचा हक्क हिसकावला असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

SCROLL FOR NEXT