Nawab Malik Dainik Gomantak 
महाराष्ट्र

नवाब मलिकांना 8 दिवसांची कोठडी, पक्षाचा राजीनामा न स्वीकारण्याचा निर्णय

न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत सुनावली कोठडी

दैनिक गोमन्तक

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी दुपारी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. सुमारे 8 तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. अटकेनंतर मलिक यांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना पीएमएलए न्यायालयात (court) हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, ईडीने मलिक यांच्या कोठडीसाठी कोर्टाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली. न्यायालयाने नवाब मलिक यांना 8 दिवसांच्या म्हणजेच 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र सरकारने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेवर आक्षेप घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप पाटील आणि राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्या घरी पक्षाच्या पुढील कार्यकरणीसाथी बैठक घेतली. त्यात राष्ट्रवादीने (NCP) नवाब मलिक यांचा राजीनामा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आम्ही भाजपपुढे झुकणार नाही, असे सांगण्यात आले. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी सूचना केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT