Narayan Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

नारायण राणे यांना जामीन मंजूर

153 आणि 505 हे सेक्शन बेकायदेशीरित्या नारायण राणे यांच्याविरोधात पोलिसांनी लावली आहेत, असा युक्तिवाद राणेंच्या वकिलांनी न्यायालयात सुनावणी दरम्यान केला होता.

दैनिक गोमन्तक

महाड न्यायालयाने नारायण राणे यांचा जामीन मंजूर केला आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्याविरोधात महाड न्यायालयात सुनावणी सुरु होती. यातच पोलिसांनी न्यायालयात नारायण राणे यांची सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबाबत भाष्य केल्याने पोलिसांनी कोठडी मागितली होती. राणे यांनी केलेल्या वक्तव्यामागे कोणत्या प्रकारचा करण्याचा विचार होता का? याचा तपास करण्यात येत आहे. 153 आणि 505 हे सेक्शन बेकायदेशीरित्या नारायण राणे यांच्याविरोधात पोलिसांनी लावली आहेत, असा युक्तिवाद राणेंच्या वकिलांनी न्यायालयात सुनावणी दरम्यान केला होता.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी मुबंई उच्च न्यायालयाने नकार दिला होता . राणेंच्या अटकेची मूळ प्रत न मिळाल्यामुळे आणि सबमिशनची प्रोसेस पूर्ण करण्यात न आल्यामुळे न्यायालयीन सुनावणी उद्या दहा वाजता होणार असल्याचे सांगितले आहे. उच्च न्यायालयात राणे यांनी अर्ज यापूर्वीच केला होता.

मात्र उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्याचबरोबर न्यायालयाने यावेळी राणेंना कायदेशीर पध्दतीने अर्ज करा असं सांगितलं होतं. रत्नागिरी न्यायालयाने केंद्रीय मंत्री राणे यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर मात्र राणे यांना अटक करण्यात आली होती. राणे यांना रत्नागिरीमध्ये अटक केल्यानंतर नारायण राणे यांना महाडमधील न्यायालयात आणण्यात आले आहे. दुसरीकडे नारायण राणे यांना अटक केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करत जयघोषणा दिल्या होत्या. मात्र भाजपमधील राणे समर्थकांनी आक्रमक झालेले यावेळी पाहायला मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT