Nagpur Car drowned
Nagpur Car drowned Dainik Gomantak
महाराष्ट्र

पुराच्या पाण्यात गाडी घातली अन् चार जणांना जलसमाधी, चार जणांचा शोध सूरु

दैनिक गोमन्तक

सध्या पावसाळा सुरु असून पावसाळ्यात पूरामळे पाण्यात जल समाधी मिळाल्याच्या बातम्या धडकत असतात. मात्र अतिउत्साहीपणामूळे काही तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूर येथे पुराच्या पाण्यात स्कॉर्पिओ घातल्याने 7 ते 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. ( Scorpio drowned in flood waters at Nagpur; Four drowned, search for four begins )

मिळालेल्या माहितीप्रमाणे आज नागपूरातील दातूर येथील सात ते आठ जण स्कार्पिओने नांदागोमुख येथे कार्यक्रमासाठी आले होते. दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास सर्वजण स्कॉर्पिओने परत जात असताना नांदा- छत्रापूर मार्गावर नाल्यात चालकाने पाण्यात गाडी घातली. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने स्कॉर्पिओ बुडाली.

या स्कॉर्पिओमध्ये असलेल्या आठ जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत आतापर्यंत एका मुलासह तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर उर्वरित प्रवाशांचा कसून शोध घेण्यात येत आहे. तसेच मृत तिघेही मध्यप्रदेशातील मुलताईअंतर्गत येणाऱ्या दातूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदा छत्रापूर नाल्याला पूर आला होता. त्यानंतरही चालकाने या पुलावरुन स्कॉर्पिओ काढली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाहता पाहता स्कॉर्पिओ वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच केळवद पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी शोध घेतला असता एक मुलगा, महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळूला आहे. तर इतरांचा शोध सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : भाजपमधील मोहरे धोक्यात; लोकसभा निवडणूक निकालानंतर ठरणार नेते-पदाधिकाऱ्यांंचे राजकीय भवितव्य

Panaji News : गोवा घडविण्याची प्रक्रिया अजूनही कायम : राजू नायक

Panaji News : चुकीच्या मानसिकतेचा फेणीला फटका; बारचालकांनी प्रचार, प्रसार करणे गरजेचे

Crime News : गरोदर महिलेला मारहाण, पोलिस स्थानकावर धडक; सखोल चौकशी करण्याची महिलांची मागणी

Goa Rain : कडाक्याच्या उष्म्यावर अवकाळी सरींचा गारवा; १५ मे पर्यंत पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT