“रत्नागिरीच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद…”

शिवसेना नेते अनंत गीते यांनी बंडखोरीवरून आमदारांना फटकारलं
Shivsena News
Shivsena NewsDainik Gomantak

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. ज्याची खमंग चर्चा राजकिय क्षेत्रात चांगलीच चघळली गेली. या बंडाचा परिणाम महाराष्ट्राची सत्तापालट होण्यापर्यंत झाला. प्रारंभी शिवसेना नेत्यांनी यावर बोलणे टाळले असले तरी, शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अनंत गीते यांनी बंडखोरांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Shivsena News
Bhima Koregaon Case: SC कडून वरवरा रावांच्या अंतरिम जामिनाला मुदतवाढ

बंडखोरीच्या सत्ता नाट्यानंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना. आता स्थानिक पातळीवरील राजकारणावर देखील याचा प्रभाव पडताना दिसत आहे. शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या कोकणात या राजकीय घडामोडींचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना नेते अनंत गीते यांनी या बंडखोरीवरून परखड शब्दांत टीका केली आहे.

रत्नागिरीत झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, जे गेलेत ते व्यक्तीगत स्वार्थासाठी गेले आहेत. त्यांना परत बोलावू नये असे मी उद्धव ठाकरे यांना सांगणार असल्याचे ही ते म्हणाले. तसेच आता बंडखोरांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे. आणि साखळी भाजपाच्या हातात आहे. असं ही ते म्हणाले.

Shivsena News
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय, NDAच्या उमेदवाराला पाठिंबा

आणि रत्नागिरीच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद

यावेळी बोलताना अनंत गीतेंनी महाड आणि रत्नागिरीच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद शिवसेनेत असल्याचा टोला लगावला. त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे ? यावरून राजकीय चर्चा सुरू झाली असून तो योगेश कदम आणि उदय सामंत या दोन बंडखोर आमदारांच्या दिशेने असल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेच्या विरोधात बंड करूनसुद्धा आम्ही शिवसैनिकच

रत्नागिरी जिल्ह्यातून आमदार योगेश कदम आणि उदय सामंत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या विरोधात बंड करूनसुद्धा आम्ही शिवसैनिकच आहोत असे दोघेही ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे या मेळाव्यात गीते यांनी दोन्ही बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. तसेच भाजपवरही सडकून टीका केली. ते म्हणाले की, नारायण राणे, छगन भुजबळ यांनी केलेले बंड वैयक्तिक होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड भाजपप्रणित आहे. या बंडातून सामान्य जनतेला किंवा शिवसैनिकांना काहीही मिळणार नाही. सत्तेसाठी लाचार झालेले हे आमदार बंडात सहभागी झाले आहेत. जे गेलेत ते परत येणार नाहीत. या बंडखोरांच्या गळ्यात भाजपाने पट्टा बांधला आहे. त्याची साखळी भाजपच्या हातात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com