Muslim Spiritual Leader Khwaja Sayyad Chishti Murder In Nashik Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

Khwaja Sayyad Chishti Murder: नाशिकमध्ये मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या

हा सुफा बाबा अफगाणिस्तानचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

Murdered in Nashik: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका 35 वर्षीय सूफी संताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा सुफा बाबा अफगाणिस्तानचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 आरोपींचा या प्रकरणात समावेश आहे. खुनाची ही घटना येवला तालुक्यातील चिचोंडी एमआयडीसी परिसरात घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाण नागरिक सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचे वय सुमारे 35 वर्षे होते. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Khwaja Sayyad Chishti Murder)

नाशिकमध्ये सुफी संताची हत्या का झाली?

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अफगाणिस्तानातील एका सुफी संताची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. येवला तालुक्यातील चिचोंडी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. मात्र, हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती असे मृताचे नाव आहे. हत्येनंतर चार अज्ञात इसम चारचाकी वाहनातून फरार झाले. स्थानिक एसपी सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफी संत चिश्ती यांनी काल शहरात दोन-तीन ठिकाणी जाऊन भोजन केले होते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आधी एकाला अटक केली आहे. त्यानंतर याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मालमत्तेच्या वादातून खून होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आर्थिक वादातून खून झाला का?

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सुफी बाबाच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती हा अफगाण धर्मगुरू असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये उघड झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT