Munde supporters angry again, Pritam Munde's repercussions in Beed Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंडे समर्थक पुन्हा नाराज, प्रीतम मुंडेंना डावलल्याचे बीडमध्ये पडसाद

कारण प्रीतम मुंडेंना(Pritam Munde) मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून बीडमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे.

दैनिक गोमन्तक

सबंध देशाचे लक्ष लागून असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळाचा विस्तार(Cabinet Expansion) नुकताच पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील(Maharashtra) चार खासदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली.यातच बाहेरून येणाऱ्या नेत्यांना मंत्रिपदाची संधि देताना मात्र निष्ठावंतांना डावललं गेले अशी चर्चा सुरु आहे महाराष्ट्रात सुद्धा असेच चित्र समोर यर्त आहे. कारण अंतिम यादी येईपर्यंत चर्चेत असलेल्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांना डावलण्यात आलं.

याचेच पडसाद आता बीडमध्ये(Beed) उमटायला सुरुवात झाली आहे कारण मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून बीडमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे.

दरम्यान पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त दोन दिवसांपासून येत होते खरे यामुळे पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत.त्यांनी नाराज नसल्याचं स्पष्ट करत 'टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे' असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले होते.

अगोदर भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या व्यतिरिक्त शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या आणखीन विविध 14 पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.

मुळातच प्रीतम मुंडे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी चर्चा महाराष्ट्रात बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. वारंवार मुंडे भगिनींवर अन्याय केला जात असल्याचा एक सूरही त्यांच्या समर्थकांत सतत उमटत असतो. राज्याच्या विधानपरिषदेवेळी ही हेच झालेले पाहायला मिळाले कारण पंकजा मुंडेंना डावलत त्यावेळी सुद्धा आयारामांनाच संधी देण्यात अली त्यावेळेपासूनच मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत आणि आता दिल्लीतही त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने राज्यात पुन्हा एकदा मुंडे गट आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे आणि त्याचेच प्रमाण म्हणजे आज आलेले हे राजीनामे होय.

आता या राजीनाम्यानंतर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

SCROLL FOR NEXT