Mumbai Sawantwadi Express Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Sawantwadi Daily Express: गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना रेल्वेचं मोठं गिफ्ट! मुंबई-सावंतवाडी नव्या डेली एक्सप्रेसला मंजुरी; चाकरमान्यांचा प्रवास होणार सुकर

Mumbai Sawantwadi Express Daily Train: बाप्पाच्या आगमनासाठी गावी जाणाऱ्या भक्तांची गर्दी आणि गाड्यांचे हाऊसफुल्ल बुकिंग लक्षात घेता, गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने कोकणवासीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिली.

Manish Jadhav

Mumbai Sawantwadi Express Daily Train: गणेशोत्सव म्हटलं की, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याचे डोळे कोकणाकडे लागलेले असतात. बाप्पाच्या आगमनासाठी गावी जाणाऱ्या भक्तांची गर्दी आणि गाड्यांचे हाऊसफुल्ल बुकिंग लक्षात घेता, गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने कोकणवासीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिली. मुंबई आणि कोकण किनारपट्टीदरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 'मुंबई-सावंतवाडी' दरम्यान नवीन डेली एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यास मंजुरी दिली. गणेशोत्सवाच्या तोंडावर मिळालेल्या या मोठ्या भेटीमुळे चाकरमान्यांचा, पर्यटकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि विनासायास होणार आहे.

ही नवीन मुंबई-सावंतवाडी एक्सप्रेस ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान दररोज धावणार असून, सुमारे 510 किलोमीटरचे अंतर पार करेल. मुंबईहून सावंतवाडीसाठी ही ट्रेन गाडी क्रमांक 15087 म्हणून सुटेल, तर सावंतवाडीहून मुंबईच्या परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 15088 म्हणून धावेल. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि विशेष गाड्यांचे होणारे बुकिंग लक्षात घेता, ही दैनंदिन ट्रेन चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

कोकणातील (Konkan) जास्तीत जास्त गावांना आणि शहरांना जोडण्यासाठी ही एक्सप्रेस ट्रेन मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांचा समावेश आहे. या थांब्यांमुळे मध्य आणि दक्षिण कोकणातील नागरिकांना थेट मुंबई गाठणे सोपे होणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील प्रसिद्ध मंदिरे, किल्ले आणि समुद्रकिनाऱ्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड वाढते. या नवीन दैनंदिन सेवेमुळे केवळ सण-उत्सवातील गर्दीच नियंत्रणात येणार नाही, तर कोकणातील पर्यटन क्षेत्राला आणि स्थानिक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनाही मोठी चालना मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे मुंबई आणि कोकणातील बंध अधिक घट्ट होणार असून, आगामी गणेशोत्सव कोकणवासीयांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'RGP'तील वाद चिघळला! वीरेश बोरकर पक्षाचे नाव, चिन्ह बेकायदेशीररीत्या वापरत असल्याचा आरोप; कायदेशीर कारवाईची तयारी

FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT