NCB Maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

NCB ची कारवाई: वॉटर प्युरिफायरमध्ये लपवून ठेवलेले 5 किलो चरस जप्त, दोघांना अटक

दैनिक गोमन्तक

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) युनिटने वॉटर प्युरिफायरच्या आत बनवलेल्या विशेष छिद्रात लपवून ठेवलेली 4.88 किलो चरस जप्त केली आहे, जी कुरिअरद्वारे ऑस्ट्रेलियाला पाठवली जाणार होती. त्याचबरोबर याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. एनसीबीने जप्त केलेल्या औषधाची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई एनसीबी कडून करण्यात आली आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (Maharashtra Crime)

ड्रग्सची खेप वॉटर प्युरिफायरमध्ये बनवलेल्या पोकळीत लपवण्यात आली होती, जी ऑस्ट्रेलियाला पाठवली जाणार होती. एजन्सीने कन्साइनर आणि कुरिअर एजंटला अटक केली, कुरिअर फ्रँचायझीचा मालकही तस्करीत सामील असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दोघांच्याही प्राथमिक चौकशीत कुरिअर फ्रँचायझीच्या मालकाचाही अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. कुरिअर एजंट कंसाइनरच्या ओळखीची पडताळणी न करता पार्सल पाठवत असे आणि मुख्य प्राप्तकर्त्याच्या सूचनेनुसार अनेक वेळा असे अनेक पार्सल पाठवले होते. असे तपासात निष्पन्न झाले. एजंटने कुरिअरद्वारे पार्सल पाठवण्यासाठी बनावट ओळखीचा वापर केला. या नेटवर्कने यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारची पार्सल पाठवली आहेत. यामध्ये संपूर्ण डिलिव्हरी नेटवर्क काम करत आहे. या प्रकरणी एनसीबीने गुन्हा दाखल केला आहे आणि अधिक तपास करत आहे,असे अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT