Pravin Darekar Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबै बँक प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रवीण दरेकरांना अटकेपासून दिलासा

राज्याचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला.

दैनिक गोमन्तक

राज्याचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा मिळाला. मुंबै बँकेच्या निवडणुकीत ‘बोगस’ मजूर प्रकरणी दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. (Mumbai High Court releases Pravin Darekar from arrest)

या संपूर्ण प्रकरणाचा अनेक वर्ष तपास सुरू आहे त्यामुळे अटकेची आवश्यकता नसल्याचं, उच्च न्यायालायने म्हटलं आहे. न्यायालयाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठी धक्कादायक असल्याचं बोललं गेलं आहे. तर, केवळ राजकीय हेतूने प्रेरीत असा हा एफआयआर नोंदवला गेल्याचं यावरून दिसून येते आहे, असं दरेकरांच्या वकिलांनी म्हटलं आहे.

याशिवाय, जरी तपासा दरम्यान पोलिसांनी दरेकरांना अटक केली तरी त्यांना तत्काळ 50 हजारांच्या बंधपत्रावर सुटका करण्याचे आदेशही न्यायालायने दिले. दरम्यान, मुंबै बँकेच्या निवडणुकीत ‘बोगस’ मजूर ठरलेल्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.

दरेकरांटी सोमवारी तीन तास चौकशी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने () चौकशीच्या नावाखाली आपला छळ मांडला आहे, असा आरोप दरेकर यांनी त्यावेळी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Updates: वाळपई विठ्ठलमय

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

SCROLL FOR NEXT