Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर उद्या आंदोलन; कामाच्या संथ गतीचा 'असा' नोंदवणार निषेध

जनआंदोलन समितीचा पुढाकार; दिवसाला 4 किलोमीटरचे उद्दिष्ट असताना महिन्यात केवळ 2.5 किलोमीटरचे काम झाल्याचा आरोप

गोमंतक ऑनलाईन टीम

Mumbai-Goa Highway Bike Rally: मुंबई-गोवा महामार्गाचे काम बारा वर्षे झाले तरीही रखडलेल्या स्थितीत आहे. न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश, मंत्र्यांची आश्वासने आणि त्यानुसार प्रशासन व कंत्राटदार यांना दिलेले सूचना इशारे यांना हरताळ फासल्याचे दिसून येते.

त्यामुळे मुंबई-गोवा हायवे जनआंदोलन समितीने रविवार 7 मे 2023 रोजी दुचाकी रॅली काढण्याचे जाहीर केले आहे.

दुपारी 4 वाजता या रॅलीची सुरुवात कामोठे टोल प्लाझा येथून होऊन संध्याकाळी 6.30 च्या सुमारास खारपाडा टोल प्लाझा येथे समारोप होईल. . खारपाडा येथे समारोप सभा होऊन पुढची दिशा जाहीर केली जाईल.

पळस्पे ते झाराप पर्यंतच्या 451 किलोमीटरच्या हायवेच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई-गोवा हायवे जनआक्रोश समिती स्थापन झाली होती. समितीने प्रशासन, राजकीय नेते, कंत्राटदार, स्थानिक आणि मुंबई-ठाण्यातील जनता यांच्याशी समन्वय साधून व्यापक प्रमाणावर पाठपुरावा केला.

त्याचे फलित म्हणून पळस्पे ते कासू या टप्प्याच्या कामाचे कार्यादेश मिळाल्यानंतर कंत्राटदार जे. एम. म्हात्रे या कंपनीने कामाला सुरुवात तर केली, परंतु दिवसाला चार किलोमीटर टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना मागील एका महिन्यात केवळ अडीच किलोमीटरचे काम झाले आहे.

कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील कामाला तर अजून सुरुवातही झालेली नाही. तसेच परशुराम घाट, संगमेश्वर, लांजा या भागात अजूनही मोठया प्रमाणात काम अपूर्ण आहे.

म्हणूनच, आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि समस्त कोकणवासीयांना या विषयावर पुन्हा संघटित करून आंदोलन तीव्र करण्याची सुरुवात म्हणून मुंबई-गोवा हायवे जनआंदोलन समितीने 7 मे 2023 रोजी दुचाकी रॅली काढण्याचे जाहीर केले आहे. समितीचे हे पहिलेच आंदोलन आहे.

समितीच्या या आंदोलनात व उपक्रमात इतर संस्था संघटनांनीदेखील सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. कोकणातील अनेक संघटनांनी या बाईक रॅलीला पाठिंबा दर्शवला आहे.

कोकण कृती समिती, कोकण विकास समिती, कोकण विकास युवा मंच, रायगड मी मराठी प्रतिष्ठान, गवळी समाज सेवा संघ रायगड-रत्नागिरी, रायगड स्वराज्य संघटना, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्हा संघटना, कोकण प्रतिष्ठान-दिवा कोकण युवा संस्था, पनवेल एम. आर. असोसिएशन यांचा यात समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT