Heavy Rain In Ratnagiri Mumbai Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! रत्नागिरीत पावसाचं थैमान; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

Heavy Rain In Ratnagiri: कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरीसह शेजारच्या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढले आहे. अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे.

Manish Jadhav

कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरीसह शेजारच्या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढले आहे. अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या महामार्गावरील अंजणारी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ ब्रिटीशकालीन अंजणारी पुलावरील वाहतूक बंद करण्यत आलीये.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळी प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत पोहोचले आहे. तर अर्जुना नदीपात्रात असलेलं पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेलं आहे.

पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठाही अनेक ठिकाणी खंडीत झालाय. काही ठिकाणी तर वीज वाहिन्यांवर मोठमोठी झाडे पडल्याने पोल आणि वीज वाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडीत झाला. दुसरीकडे मात्र प्रशासनाने या भागातील लोकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, जगबुडी नदीसह शास्त्री, काजळी, मुचकुंदी आणि कोदवली या नद्यांच्या पाण्याची पातळीत वाढ झालीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT