Mumbai Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरुन चाकरमान्यांचा प्रवास होणार सुकर; महत्वाची अपडेट आली समोर

Mumbai Goa Highway: कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Manish Jadhav

कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या दुथडी भरुन वाहतायेत. पावसाळ्यातच कोकणी बांधवासांह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशत्सोव सण साजरा केला जातो. हा सण काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात आतापासूनच गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे. कोकणी बांधवांनी कोकणाकडे जाण्यासाठी तिकीट बुकींगही सुरु केले आहे. कोकणात जाण्यासाठी कोकण रेल्वे आणि मुंबई-गोवा महामार्ग महत्त्वाचा मानला जातो. आता या महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. होय,... मुंबई-गोवा महामार्गाविषयी महत्वाची अपडेट महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा महामार्ग गणपतीपूर्वीच पूर्ण होणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मंत्री महोदयांनी यासंबंधीची डेडलाईनही दिली आहे. रत्नागिरीत काही समांतर रस्ते आणि उड्डाणपूलांची कामे अपूर्ण आहेत. ते पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा लक्ष घातलं आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी या महामार्गाच्या कामासंबंधी नितीन गडकरींची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंबंधी विनंती केली होती.

मुंबई-गोवा महामार्ग खडडेमुक्त होणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी निर्देश दिले. या महामार्गावरील बायपास, सर्व्हिस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करावा, करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. याशिवाय, 10 ऑगस्टनंतर या महामार्गाच्या कामांचा पाहणी मुख्यमंत्री शिंदे करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT