Mumbai CNG PNG Updates | Gas Price Hike Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईकरांना झटका, CNG अन् PNG च्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन किंमत

मुंबईकरांना आज पुन्हा महागाईचा झटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

Mumbai CNG-PNG Price Hike: मुंबईकरांना आज पुन्हा महागाईचा झटका बसला आहे. प्रत्यक्षात, महानगरातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस ( CNG) आणि पाइप्ड नॅचरल गॅस ( PNG) च्या किमतीत मंगळवारी मध्यरात्रीपासून वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील महानगर गॅस लिमिटेडने मंगळवारी शहरात सीएनजीच्या दरात प्रति किलो 4 रुपये आणि पीएनजीच्या दरात 3 रुपयांची (Standard cubic meter) वाढ केली. महत्त्वाचे म्हणजे, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढण्यामागे वाढीव किंमत आणि रुपयाचे अवमूल्यन हे कारण आहे.

मुंबईत सीएनजी-पीएनजीची वाढलेली किंमत किती आहे?

13 जुलैपासून मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजी महाग झाले आहेत. नवीन किंमत खालीलप्रमाणे आहे.

  • मुंबईत सीएनजीची (CNG) किंमत - 80 रुपये प्रति किलो

  • मुंबईत पीएनजीची किंमत - 48.50 रुपये

सीएनजी आणि पीएनजीच्या किमती का वाढल्या?

महानगर गॅस लिमिटेडने एक निवेदन जारी करुन म्हटले आहे की, “घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने MGA च्या उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai CNG PNG News)

यापूर्वी 29 एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती

अलीकडेच, घरगुती एलपीजी सिलिंडर देखील महाग झाला आहे. प्रति सिलेंडर 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर मुंबईत (Mumbai) एलपीजी सिलिंडरची किंमत 153 रुपयांवर गेली होती. आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करुन सर्वसामान्यांना महागाईची झळ बसली आहे. याआधी मुंबईत 29 एप्रिल रोजी सीएनजीच्या किमतीत चार रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT