Mumbai News  Dainik Gomantak
महाराष्ट्र

बलात्कार पीडितेला धमकी; दाऊदचे नाव घेत दिली तंबी

मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेत यापूर्वी ही अनेकदा गुन्हेगारांनी आपली कुकर्म खपवली आहेत. असे असले तरी दाऊदच्या नावाची धमकी देत एका बलात्कार पीडितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचीबाब समोर आली आहे. ( Mumbai businessman charged with rape; Woman complains of threatening in the name of Dawood Ibrahim )

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका 75 वर्षीय व्यावसायिकाने 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. तसेच धक्कादायकबाब अशी की, व्यापारी आरोपीने पीडितेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेत धमकी दिली आहे, की जर तीने पोलिसात तक्रार केली तर ठार मारेन. त्यामुळे आरोपीवर मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 376 (2) एन, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावाने महिलेला धमकी

आरोपीबाबत तक्रार नोंदवताना पीडित महिलेने म्हटले आहे की, आरोपी व्यावसायिकाने तिच्याकडून 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते परत केले नाही. तसेच पीडित महिलेने आपल्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावाने या व्यावसायिकाने महिलेला थेट धमकी दिली आहे. व्यापाऱ्याने त्याला सांगितले की दाऊद इब्राहिम हा माझा मित्र आहे, आणि हाजी मस्तान हा माझ्या पत्नीच्या बहिणीचा नवरा आहे.

बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारु

बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारु अशी धमकी या व्यावसायिकाने दिल्याचा आरोप बलात्कार पीडितेने केला आहे. एमआयडीसीच्या हद्दीत हा गुन्हा झाल्याने सध्या या प्रकरणाचा तपास आंबोली पोलिसांकडून एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस महिलेच्या दाव्याची चौकशी करत असून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीसांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: 'शतक' नाही, 'त्रिशतक'! जसप्रीत बुमराह बनणार क्रिकेटचा 'ऑल-फॉरमॅट किंग', फक्त 2 विकेट्सची गरज

Ravindra Bhavan Margao: मडगाव रवींद्र भवनातील 'पाय तियात्रिस्‍त' सभागृह पुन्हा खुले, दुरुस्‍तीवर सव्वादोन कोटी खर्च; मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

Dark Fog In Goa: पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर, सूर्यही उगवतोय विलंबानेच; काजू, आंब्यांच्या झाडांचा मोहोर करपून जाण्याचा धोका

Konkani Drama Competition: साखळीत आजपासून 'कोकणी नाट्य' स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन; सत्तरी, डिचोलीतील 18 मंडळांचा सहभाग

IND vs AUS: चौथ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्मा रचणार इतिहास, कोहलीच्या 'विराट' विक्रमाची बरोबरी करणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

SCROLL FOR NEXT