MSRTC  Dainik Gomantak
महाराष्ट्र

MSRTC: ठाण्यात धावत्या एसटी बसला आग, 65 प्रवाशी थोडक्यात बचावले

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, संपूर्ण आग विझवण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

एसटी महामंडळाच्या धावत्या बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्याहून भिवंडीच्या दिशेनं जात असताना ही घटना घडली. बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे बसमील 65 प्रवाशांचा जीव वाचला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, संपूर्ण आग विझवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MSRTC बस मंगळवारी सकाळी भिवंडी आगाराची बस ठाणेहून भिवंडीच्या दिशेने जात होती. बसमध्ये चालक आणि वाहक यांच्यासह 65 प्रवाशी प्रवास करीत होते. दरम्यान, दर्ग्यासमोर बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. चालक आनंद विठोबा सवारे यांनी प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या बाजूला घेतली. तसेच प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. काही वेळातच सर्व प्रवाशी बसमधून खाली उतरले.

दरम्यान, तात्काळ अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. याशिवाय स्थानिक लोकांनी बसमधून प्रवाशांना खाली उतरवत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT